खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठाणेदाराच्या आशिर्वादाने अवैध धंद्यांना ऊत ;सात दिवसाच्या आत अवैधधंदे बंद करा सामाजिक कार्यकर्त्याची मागणी!

पुसद: तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील परिसरात अवैध धंद्यांना ऊत आला आहे.यामध्ये अवैध देशी व हातभट्टी दारु गाळप , अवैध मटका, जुगार, चक्री भिंगरी, जुगार, गांजा,गावठी हातभट्टी दारू गाळप, अवैधरीत्या देशी-विदेशी दारूचा साठा-विक्री, बनावट दारू उत्पादन, अवैध वाहतूक,अवैध प्रतिबंधित पान मसाला गुटखा सुगंधित तंबाखु, रेती उत्खनन, यासारखे अवैध धंदे खुलेआम मोठ्या जोमात राजरोसपणे सुरु असल्याने या अवैध धंदे करणाऱ्यांच्या नाव व गावासह जिल्हापोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्याकडे सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्याकडे तक्रार दाखल केली केली असून हे अवैध धंदे सात दिवसांत बंद करुन या अवैध धंद्यांना हाप्तेखाऊ धोरणआखुन ठाणेदार रुजू झाले तेव्हापासून पाठबळ देत असल्याने या ठाणेदारांची अवैध धंदे बंद असल्याच्या ‘हमीपत्र’ आदेशाची पायामल्ली केल्या प्रकरणी तात्काळ उचल बांगडी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पुसद तालुक्यातील खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरातील अनेक गावात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. त्यामुळे या परिसरात नेमके चालले तरी काय.? हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा बहुधा माहिती नसते.त्याचाच गैरफायदा खंडाळा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुजू झाले तेव्हापासून घेत असल्याने अनेक बीट मध्ये अवैध धंद्याला ऊत आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी या पोलिसांची नेमणूक शासनाने केली आहे. मात्र पोलिसांनी या बेकायदा व्यवसायांकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावात अवैध धंदे जोमात राजरोसपणे सूरु आहे. दररोज लाखो रुपयांची उलाढाल या अवैध धंद्यातून सुरू आहे. यामध्ये हातभट्टी दारु गाळप , अवैध मटका, जुगार, चक्री भिंगरी, गांजा, अवैधरीत्या देशी-विदेशी दारूचा साठा-विक्री, बनावट दारू उत्पादन, अवैध वाहतूक, अवैध प्रतिबंधित पान मसाला गुटखा सुगंधित तंबाखु, रेती उत्खनन,यासारखे अवैध धंदे खुलेआम मोठ्या जोमात राजरोसपणे सुरु असल्याने प्रत्येक पोलीस बिटमधील एक – दोन पोलीस कर्मचारी या मटक्यावर चांगलेच नियंत्रण ठेवून आहेत. या अवैध धंदे करणाऱ्या कडून तसेच मटक्या बुकी कडून महीन्याकाठी ठरलेली मलिदा वेळेत वसूल होत असलेने कारवाई करण्यास खंडाळा पोलिसाकडून टाळाटाळ होत आहे. ग्रामीण भागातील तरूण कमी गुंतवणुकीचा व्यवसाय म्हणुन हॉटेल पाणठेला, चहाची टपरी अशा व्यवसायाकडे वळत होते. मात्र, आता कमी गुंतवणुकीत जादा नफा कमावण्याच्या नादात अवैध देशी गावठी दारू विक्री, तितली चक्री भवरा, जुगार, मटका अशा अवैध धंद्याकडे त्यांचा कल वळल्याचे दिसून येत आहे. पान ठेला किंवा चहा टपरीच्या माध्यमातून दहा वर्षांत जेवढा पैसा कमावता येणार नाही, तेवढा पैसा अवैध धंद्यात केवळ दोन ते तीन वर्षांत कमावता येतो असा त्यांचा समज आहे. त्यामुळे अधिक पैसा कमावण्याच्या लालसेने पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे अवैध धंदे गृहउद्योग व उदरनिर्वाहाचे साधन झाले आहे. त्याचाच फायदा घेत खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार व हप्तेखोर बीट जमादांरानी परिसरातील अवैध धंद्यांना ‘एनओसी’च दिली आसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.अशा अवैध धंद्याकडे पोलिस विभागाकडून दुर्लक्ष सुरू आसल्याने अवैध धंद्यांना जणु मोकळे रानच मिळाले आहे. या अवैध धंद्यांनी कित्येक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तरीही या धंद्याच्या नादी लागणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. व्यसनाकरीता ते काहीही करायला तयार होतात. उलट ते स्वत: व आपल्या कुटुंबाला संकटाच्या दारात उभे करीत आहेत. अशा हप्ताखोर पोलिसांचा भांडाफोड करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मारोतराव शामराव कांबळे, व विष्णू पुंडलिक सरकटे यांनी जिल्हा पोलस अधीक्षक यवतमाळ यांच्याकडे खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुजू झाले तेव्हापासून अवैध धंद्यांना ऊत आल्याची तक्रार दाखल केली असून यामध्ये खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील परिसरात अवैध देशी व गावठी दारू अवैध मटका, जुगार, गांजा, अवैध गुटखा, देशी विदेशी दारूचा साठा व विक्री, प्रतिबंधित सुगंधी पान मसाला गुटका, तितली चक्री भवरा, अवैध वाहतूक, रेती तस्करी हे अवैध धंदे करणाऱ्यांच्या नावं व गावांसह तक्रार दाखल केली असून हे राजरोसपणे जोमात सुरू असलेले अवैध धंदे सात दिवसाच्या आत बंद करून या अवैध धंद्याला पाठबळ देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे हे अवैध धंदे सात दिवसाच्या आत बंद न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.