राजकिय

पुसद शहराचा खरा धुरंधर कोण? हे मात्र २१ डिसेंबर रोजी कळणार!

पुसद : नगर परिषदेच्या २०२५ सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल येत्या २१ डिसेंबरला येणार आहे या निवडणुकीत स्थानिक पातळीवर शहरातील जवळपास सर्वच पक्षाने म्हणजे महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीतील सर्वच सहकारी घटक मित्रपक्ष एकमेका विरुद्ध लढले ही निवडणूक नुसती निवडणूक नसून या शहराला नवीन वळण व दिशा देणारी निवडणूक होती या निवडणुकीत अनेक मातब्बर नेत्याची प्रतिष्ठापनाला लागली असून या निवडणुकीच्या निकालावर अनेक नेत्याचे व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे तसेच राजकीय पक्षाचे भविष्य ठरणार आहे त्यामुळे २१ डिसेंबर रोजी या शहराचा खरा धुरंदर कोण? हे मात्र जनतेला कळणार आहे.

पुसद नगरपरिषदेची निवडणूक अनेक वर्षानंतर झाली असल्यामुळे शहरातील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात उमेदवारीच्या रणांगणावर उतरलेले चेहरे पाहिले तर चित्रं मात्र उलट होतं. महाविकास आघाडी सोडली तर महायुतीच्या सहकारी घटक मित्रपक्षातील नेत्यांनी महायुतीतीला तिलांजली देत किंवा दोस्तीत आतुन साठ- गाठ करून या निवडणुकीला महायुतीतील सहकारी मित्रपक्ष एकमेकांसमोर रणांगणात उतरले होते.नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदासह १५ प्रभागांमध्ये ३१ नगरसेवक पदासाठी ही निवडणूक द२ डिसेंबर रोजी मतदान पार पडले. खरं तर लोकशाहीत निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवणं अपेक्षित होतं… कारण पैसे न घेतलेला व्यक्तीच आपले प्रश्न सत्ताधाऱ्यांपुढे मांडू शकतो…मात्र राजकीय नेते निवडणूकीत पैसे फेकून लोकांचं फक्त मत नाही विकत घेण्याचे मनसुबे आखत होते.. मात्र राजकीय नेते पैसे वाटून मत नाही तर तुमचा स्वाभिमान विकत घेत आहेत.. त्यामुळे मतदारांनी स्वाभिमान विकून गुलामाचं जीणं जगायचं की पैसे वाटणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची… याचा विचार करायला हवा…होता.. तरीही या निवडणुकीत पैशाचा महापूर वाहिला म्हणे, तो कुणाला दिसला नां निवडणूक आयोगाला कळला मात्र या वाहत्या गंगेत अनेकांनी आपले हात धुवून घेतले वर्तमान राजकीय व्यवस्था ‘एक विचार, एक पक्ष, एक नेता’ अशा एकाधिकरशाहीकडे प्रवास करत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधित्वाची व्यवस्था मोडकळीस येत असल्याचे चित्र जाणवत होते. याबद्दल कोणाला खेद आहे ना खंत होती परंतु निवडणूक आयोगाच्या जाहीर कार्यक्रमानिमित्त या निवडणुकीच्या मतदानाचा निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर होणार होता परंतु कोर्टाने मतमोजणीचा आदेश काढण्यात आल्याने या मतदानाच्या निकालाचा दिवस २१ डिसेंबर रोजी पुढे ढकलल्याने अनेकांना या निकालाबाबतची उत्सुकता वाढली आहे. परंतु या निवडणुकीत घराणेशाहीला सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी आपल्याच कुटुंबीयांना राजकीय पायवाटा मोकळ्या केल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वादळ निर्माण झाले होते कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायचे आणि फ्लेक्स लावायचे असे चित्र होते दुसरीकडे मात्र महायुतीतील घटक पक्षातील भाजपने मात्र सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाची आतून दोस्ती करून साठे- लोटे केले असल्याची चर्चेला मात्र या काळात उधाण आले होते परंतु ही निवडणूक नुसती निवडणूक नसून या निवडणुकीची घोषणा झाली तेव्हापासून शहराची अनेक पक्षातील मातब्बर नेते कार्यकर्ते ॲक्शनमोड मध्ये आल्याचे पाहायला मिळाले यामुळे प्रत्येक ॲक्शनला- रिएक्शन मिळाली आरोपाच्या अद्याधुंद फायरी गटबाजी, शहकाटशह, एकमेकांना धोबीपछाड दोस्तीत कुस्ती, दोस्तीत छुपी दोस्ती, खेळाडू अनेक सूत्र हलविणारे मात्र कोणी तिसराचं, असे चित्र होते. सत्ता मिळविण्याच्या या घनघोर लढाईत एकमेकांना ‘रहमान डोकेत’ ठरविण्याचा प्रयत्न केला जात होता परंतु या सगळ्यातून जिंकतील तोच असेल या शहरातील जनतेच्या मनातला खरा ‘धुरंधर’ ही निवडणूक केवळ या शहरातील मतदारांचं नव्हे तर राजकीय पक्षांचा नेत्यांचं व त्यांच्या पक्षात काम करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचं कॅरीअर घडविणारी निवडणूक असल्याने शहरातील राजकीय पक्षांना नवीन वळण देणारी निवडणूक असल्यामुळे येत्या २१ डिसेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार असल्याने या शहराचा खरा धुरंदर ‘रहेमान डकेत’ ठरणार आहे त्यामुळे शहरातील जनतेला या निवडणुकीच्या निकालांची उत्सुकता लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close