ईतर

विठ्ठलने पपई पिकातून शोधला समृद्धीचा सुगंध!

पुसद:शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील सर्वत्र ओळख असताना आजही काही शेतकरी काळ्या मातीतून सोनं पिकवित आहेत. तालुक्यातील पार्ङी येथील अल्पभूधारक शेतकरी विठ्ठल मारोती जाधव या शेतकऱ्याने एक एकर शेतामध्ये जुलै २०२२ मध्ये ५ बाय ७ या अंतरावर ठिंबक सिंचनावर पपई पिकाची बाराशे झाडाची लागवड केली आहे.

त्याचबरोबर आंतरपीक म्हणून १८ बाय २० या अंतरावर मोसंबी पिकाची सहाशे झाडाची लागवड केली आहे.पपई पीक नुकतेच काढणीला आले आहे. आतापर्यंत त्यांनी एक लाख रुपयाची पपई विकली आहे. अजून तीन ते चार लाख रुपयाची उत्पादन होईल असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

सविस्तर वृत्त असे की विठ्ठल मारोती जाधव यांच्याकडे तीन एकर शेती आहे त्याचबरोबर जोडधंदा म्हणून मोटार रिवायडींगचे दुरुस्तीचे काम करतात व दुकान आहे शेती आणि दुकान या व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असतो विठ्ठल जाधव हे नेहमी शेतात टरबूज टोमॅटो वांगे मोसंबी पपई हे पिके घेत असतात या पिकापासून त्यांना भरगोस उत्पन्न मिळत आहे पारंपरिक पिकाला फाटा देऊन त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करणे पसंत केले आहे त्यामुळे त्यांना शेतात मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे.

शेतकऱ्यांनी पारंपारिक पीके न लावता आधुनिक पद्धतीने शेती केल्यास नक्कीच उत्पादन वाढेल यामध्ये टरबूज पपई टोमॅटो वांगे मिरची फुलशेती हे पिके घेतल्यास व चांगला भाव मिळाल्यास चांगले उत्पादन होईल असे त्यांनी सांगितले-विठ्ठल जाधव शेतकरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close