ईतर

विठ्ठल नामाच्या गजराने जेट किड्स दुमदुमली

पुसद :आषाढी एकादशी निमित्त जेट किड्स स्कूलमध्ये दि.२८ जून  ०२३या दिवशी पंढरपूर वारीचे आयोजन करण्यात आले. जेट किड्स चे विद्यार्थी व विद्यार्थिनी पारंपारिक वारकरी वेशभूषेत आले होते .विठ्ठलाची पालखी जेट किड्स मधून ‘जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल’ नामाचा जयघोष करत निघाली. डोक्यावर तुळशी, हातात टाळ, ढोल- मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा गजर करत पालखी जेट किड्स च्या मैदानात परत आली. तिथे विद्यार्थ्यांनी गोल रिंगण करून फुगड्या घातल्या, व विठ्ठल नामाचा जयघोष केला. जेट किड्स चे विद्यार्थी कोणत्याही कार्यक्रमात उस्फूर्तपणे सहभागी होतात. “पांडुरंग ,पांडुरंग”, ‘जय जय राम कृष्ण हरी’ चा जयघोष करत विद्यार्थी उत्साहाने वारीचा आनंद घेताना दिसत होते . तसेच कोरटकर व जयस्वाल यांनी सुंदर अभंग संगीताची उत्तम साथ देत सादर केला.अभंगाच्या तालावर राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ठेका धरला. जेट किड्स स्कूलच्या मुख्याध्यापिका के.जी. मिनी कुरुप यांनी विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले. शाळेचे शैक्षणिक प्रमुख प्रमोद रायपूरकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांचा उत्साह वाढवत होते. नेहमी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे जेट किड्स स्कूलचे अध्यक्ष डॉ. अमोल मालपाणी व सचिव अस्मिता मालपाणी तसेच शाळेचे उपाध्यक्ष तुषार सेता सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते.तसेच आमच्या शाळेचे को-ऑर्डिनेटर सौ.साधना दुबे, बलवंत मोटे, सौ. दिपाली अधापुरे (टाक), निलेश चव्हाण उपस्थित होते. तसेच दिंडी व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते..अशा
रितीने कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close