विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूल पुसदच्या सहाव्या स्थापना दिवसानिमित्त ७० गुणवंत विद्यार्थीचा प्रतिभा गौरव पुरस्काराने सन्मानित!

पुसद: शहराला शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून विविध शाळा आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून उच्च दर्जाची शैक्षणिक सुविधा उपलब्ध झालेली आहे. या विविध सस्थां पैकीच एक अस अल्पावधीतच नावलौकिकास आलेली विद्यालकार्स पोदार लर्न स्कूल पुसद येथे दि.२३ जून २०२४ हा या शाळेचा सहावा स्थापना दिनाचे औचित्य साधून शाळेतील ७० गुणवंत विद्यार्थ्यांना शाळेचे संचालक सुरज डुबेवार, संगमनाथ सोमावार, मनिष अनंतवार, सौ. शुभदा शरद मैंद आणि सौ शिल्पा मनिष अनंतवार यांचे शुभहस्ते प्रतिभा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
काळानुसार प्रत्येक गोष्ट बदलत जात असते आणि त्याप्रमाणेच शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा अमुलाग्र बदल होत गेले आहेत. विद्यालंकार्स पोदार स्कूलच्या माध्यमातून या परिसरातील विद्यार्थ्यांना मुंबई-पुणे येथे दिल्या जाणाऱ्या उच्च दर्जाची शिक्षणाची सोय उपलब्ध झालेली आहे. विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग आणि नविन शैक्षणिक धोरणावर आधारित असलेला पोदार एज्युकेशन चा अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास मदत करणारा आहे. 
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे उच्चविद्याविभूषित उत्कृष्ट शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे शाळेचा पहिल्याच वर्षी सीबीएसई बोर्ड परीक्षेत १००% निकाल लागलेला आहे, दहावीच्या पहिल्या बॅचला शाळेतून एकूण ४५ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते त्यापैकी २३ विद्यार्थी ८०% च्या वर गुण तर ११ विद्यार्थी ९०% च्या वर गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत, हे सांगताना मोठा अभिमान होतो आहे. 
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच सर्वांगीण विकासासाठी शाळेमध्ये अनेक उपक्रम राबविले जातात. शाळेत सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा, ऍक्टिव्हिटी रूम्स, अविष्कार संगणक लॅब या आणि अशा विविध भौतिक सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी विविध प्रकारच्या खेळांचे तज्ञांकडून मार्गदर्शन वेळोवेळी केल्या जाते आणि त्यामुळेच विद्यार्थी खेळामध्ये सुद्धा अनेक वेळा विभाग स्तरापर्यंत पोहोचले आहेत . पाच वर्षांपूर्वी या शाळेची स्थापना करण्यात आली, परिसरातील पालकांनी ज्या अशा आणि अपेक्षेने आपल्या पाल्यांचे या शाळेमध्ये नाव नोंदविले त्या सर्व आशा आणि अपेक्षा शाळेमार्फत पूर्णत्वास येत असल्याची प्रचिती या पाच वर्षांमध्ये दिसून आली त्यामुळे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.



