ईतर

पुसद येथे विदर्भ राज्य जन आंदोलन समितीची बैठक संपन्न!

पुसद : येथे दि.२२ जुलै २०२३ रोजी विदर्भ राज्य जन आंदोलन समितीची बैठक श्रीरामपूर येथील  राजेश चेंदेल यांच्या रामकृषण हाईट्स येथे घेण्यात आली होती.या बैठकीत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार ॲड . वामनराव चटप हे आवर्जून उपस्थित होते. सदर बैठकीत विदर्भ मिळवू औंदा या घोषणेनुसार डिसेबर पर्यंत आरपारची विदर्भ निर्मितीकरीता लढाई लढवून लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून घेऊ हे आंदोलन मागणी पूर्ण होईपर्यंत सुरुच राहणार आहे.  मात्र राज्यसरकारने १ एप्रिल पासून विजबिलात ३७ टक्के वाढ करण्याच्या घेतलेल्या निर्णया विरोधात तसेच शासनाने कोराडी येथे २ औष्णिक वीज प्रकल्पाला मान्याता देण्याच्या निर्णयाविरोधात क्रांतीदिनी संविधान चौक ते उर्जामंत्री निवासस्थानापर्यंत लाँग मार्च काढून उर्जामंत्र्याना घेराव घालण्याचे आंदोलन करणार असल्याचे विदर्भ राज्य जनआंदोलन समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. वामनराव चटप यांनी सांगितले आहे.त्याकरिता मार्गदर्शन करण्यात आले.विदर्भाच्या सर्वांगिण विकासासाठी निधी उपलब्ध करून बेरोजगारांना रोजगारासाठी उद्योग क्षेत्रात रोजगार निर्मिती करावी यासह इतर मागण्यासाठी ९ ऑगस्ट क्रांती दिनी संविधान चौक नागपूर येथे उर्जामंत्री यांच्या निवासस्थानापर्यंत लाँग मार्च काढून उर्जामंत्र्याच्या घराला घेराव घालण्याचे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.तसेच ह्या सभेमध्ये शेंबालपिप्री येथील देव गव्हाण येथील नागरिकांनी आपल्या गावातील समस्या मांडल्या देवगव्हाण येथील जवळपास गावठाण मधील ५० % भाग हा पाण्या खाली गेला आहे आणि उर्वरित भाग हा कधीही पाण्या खाली जाऊ शकते.देवगव्हण गावाची जमीन ही काळी मातीची आहे त्यामुळे इसापूर धरण मधील पाण्याची पातळी वाढली तर भविष्यात हे गाव पाण्या मध्ये जाण्याचे शक्यता आहे असे गावकरी मंडळीनी मांडली तसे त्यांनी निवेदन सुद्धा दिले. त्यावर जन आंदोलन समितीच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी करण्यात आली.तसेच नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली असून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या तालुका उपाध्यक्षपदी पदासाठी जयानंद उबाळे, सचिव म्हणून  शंतीसागर इंगोले, कार्यध्यक्ष महणून राजेश चेंदेल , शहर अध्यक्ष म्हणून सन्नी पांडे ह्यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्ती पत्र  वामनराव चटप साहेब ह्यांच्या हस्ते देण्यात आले.सदर सभेला यवतमाळ जिल्हा अध्यक्ष  कृष्णराव भोगडे,जिल्हा उपाध्यक्ष  मधुसूदन कोवे,अविनाश पोलकट, संभाजी टेटर, रामकृष्ण चेंदेल ह्यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रम चे प्रास्तविक  सुनील गुध्दटवार ह्यांनी केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close