ईतर

निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेनेचे चिन्ह असलेल्या चारचाकी वाहने चिरडल्याने वयोवृद्ध शिवसैनिकांचा जागिच मृत्यू!

पुसद : लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या वयोवृद्ध शिवसैनिकास शिवसेना पक्षाचे चिन्ह असलेल्या चार चाकी वाहनाने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.१९ एप्रिल २०२४ रोजीच्या सायंकाळी ६.३० ते ७:०० वाजण्याच्या सुमारास घडलीछ असून चारचाकी वाहन चालक फरार झाला आहे.  

उत्तम गोमाजी गुळवे वय ६४ वर्षे रा.जामनाईक क्र.१ असे मृत्यू झालेल्या वयोवृद्धाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार दि.१९ एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी अंदाजे ६.३० ते ७ वाजताच्या सुमारास पुसद कारला रोडवरील अग्रवाल मोबाईल अँड कॅम्पुटर्सच्या समोर जामनाईक-१ वरून प्रचारासाठी आलेले उत्तम गुळवे यांना शिवसेना नावाचे चिन्ह असलेले पांढऱ्या रंगाच्या चार चाकी वाहनाने उडविले.प्रत्यक्षदर्शीच्यामते अपघात एवढा भयंकर होता की यात उत्तम गुळवे हे चक्क हवेत उसळले व त्याच चारचाकी वाहनाच्या चाकामध्ये घासत गेले.जखमी उत्तम ला तात्काळ तेथील उपस्थित लोकांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपस्थित डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.त्यानंतर त्यांचा मृतदेह येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.या घटनेची माहिती शहरात पसरताच शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे तथा खासदार भावना गवळी यांचे कट्टर कार्यकर्ते ॲड.उमाकांत पापीनवार यांनी तात्काळ शासकीय रुग्णालय गाठून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत वसंत नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करेपर्यंत उपस्थित होते हे विशेष. ज्या वाहनाद्वारे ही घटना घडली ते वाहन मात्र पसार झाले आहे. त्यामुळे शहरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.घटनेचा तपास वसंत नगर पोलीस करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close