व्हीसीए खैरागड चषक आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धा;केदार जगतापची नाबाद ३२७ रणची पारी

पुसद : विदर्भ क्रिकेट असोसिएशन नागपुर तर्फे आयोजित करण्यात आलेल्या खैरागड चषक आंतरजिल्हा क्रिकेट सामन्यात स्थानिकचा खेळाडू केदार कैलास जगतापने आज दुसऱ्या दिवशी ३२७ धावाची विक्रमी नाबाद खेळी केली.
वर्धा व यवतमाळ जिल्हा संघात हा उपांत्य सामना मोरघडे क्रिकेट अकादमी येथे ता.११ सुरू झाला. वर्धा संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला परंतु त्यांना केवळ 158 धावाच करता आल्या. यातील पाच बळी यवतमाळ च्या पुष्पक गुजरला मिळाले. यवतमाळ संघाकडून हेमंत राठोड ने ४५ चेंडूत ७३ धावा काढल्या तर वेदांत दिघडेनी १०४ रनची खेळी केली. केदारने कप्तानी पारी खेळत नाबाद २८७ चेंडूत ४१ चौकार व ६ षटकाराच्या मदतीने ३२७ धावावर तो नाबाद राहीला. अंतीम दिवशी यवतमाळ संघ चार बाद ५७९ रण वर असून ४२१ धावाची आघाडी होती. या सामन्याचा मानकरी केदार जगताप ठरला. या चषकाचा अंतीम सामना अमरावती येथे १४ मार्च ला अमरावती विरुद्ध यवतमाळ संघात होणार आहे. यवतमाळ जिल्ह्याचा संघ व्हीसीएचे जिल्हा समन्वयक बाळू नवघरे व दीपक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहे. केदारनी त्याच्या यशाचे श्रेय त्याला लहानपणापासून क्रिकेटचे धडे देणारे स्थानिकचे आशीष शुक्लासर यांना दिले.