वसमतकर महाराज व खाकी वर्दीतील माणूस संदीप वानखेडे यांच्याकडून हडसनी पूरग्रस्तांना किराणा किटचे वाटप!

माहूर:माहूरगड येथील आनंद दत्तधाम आश्रमच्या वतीने दि. २८ जुलै शुक्रवार रोजी साईनाथ महाराज वसमतकर यांनी हडसनी येथे ५३ पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या साहित्याचे वाटप केले.यात तांदूळ, डाळ, साखर, साबण, टूथपेस्ट अशा दैनंदीन जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता.
मोडून पडला तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा एवढीच या संकटग्रस्तांची अपेक्षा असते.माहूर तालुक्यात गत आठ दिवसापूर्वी महापुराणे जनजीवन विस्कळित झाल्यानंतर आता ही तीच वेळ आली आहे.नदीकाठच्या गावात नदी,नाल्याला आलेल्या पुराने सगळंच नेल्यामुळे या पुरग्रस्तांकडे काहीही उरलेलं नाही.काही ठिकाणी गरीब वस्ती मध्ये तर त्यांची कच्चीबच्चीही भुकेजलेली आहेत. पण पोट भरेल एवढं अन्नही त्यांना मिळत नाही. म्हणूनच त्यांना मदत करण्यासाठी आता आपण पुढे येणे काळाची गरज आहे.हीच गरज ओळखून नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले माहूर येथील साईनाथ महाराज वसमतकर यांनी वाटा उचलत पुर पीडित हडसनी व इतर गावांना भेटी देऊन पाहणी केली आणि गरजू लोकांना हडसणी या गावी प्राथमिक स्वरूपात ५३ परिवाराना जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले.या वेळी सरफराज दोसानी,राज ठाकूर,जयकुमार अडकिने, दत्तात्रय शेरेकर, गावातील प्रतिष्ठित नागरिक बंडू पाटील शिंदे ,भाऊ पाटील, पुंडलिक सावकार, दीपक शिंदें , अवधूत जाधव, अनिल पाटील , अर्जुन शिंदे, विलास कदम, बंडू आव्हाड ,विनोद पाटील, सुनील वानखेडे, एस.एस.पाटील सर ,सुधीर जाधव ,प्रा.विनोद कांबळे सर, आश्रमातील भक्त वैभव खराटे,अर्जुन पाटील अविनाश हुलकाने, लक्ष्मण ढगे,सह अनेकांची उपस्थिती होती.
दिनांक २१ व २२ जुलैला सर्वत्र ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आपल्या हडसनी या गावात अनेकांच्या घरात पाणी गेल्याची माहित मिळताच हडसनी येथील व सध्या किनवट पोलीस स्टेशन येथे पोलीस कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत असणारे संदीप वानखेडे यांनी पंधरा ते वीस घरांना एक महिना पुरेल एवढे किराणा किटचे वाटप केले त्यादरम्यान त्यांनी कोणताही फोटो काढू दिला नाही त्यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे