‘वसंत सागर’पूस धरण झाले ‘ओव्हर फ्लो’नागरिकांचा पिण्याच्या व शेतकऱ्यांच्या सिंचनाचा पाणी प्रश्न सुटला!

पुसद : शहरासाठी जीवनदायी असलेले पूस धरण आज शनीवार सकाळी६:०० वाजण्याच्या सुमारास शंभर टक्के भरले असून सांडव्यावरून २७ सेमीचा ‘ओव्हर फ्लो’ सुरू आहे . त्यामुळे पुसद शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा व शेतकऱ्यांच्या सिंचनाकरिता पाणी प्रश्न सुटला आहे.’ओव्हर फ्लो ‘झालेले धरण पाहण्यासाठी पुसदकरांनी धरण परिसराकडे धाव घेतली आहे. पूस धरणाच्या खोऱ्यात दमदार पाऊस झाल्याने या धरणाचा जलसाठा वाढला आहे. त्यामुळे येत्याकाळात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. मात्र यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून धरणाच्या वरील भागात संततधार पाऊस कोसळत असल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. वसंत सागर पूस धरण १०० टक्के भरले होते. पुसदकरांच्या आनंदाला उधाण आले.
हा प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने पुसदकरांना आता नियमित पाणीपुरवठा होण्याचे संकेत आहे.यावर्षी पिकांना संजीवनी देणारा पाऊस सुरू आहे तरीही खरीप हंगाम चांगला आहे.पूस धरणाच्या खोऱ्यात दमदार पाऊस झाला की प्रकल्पाचा जलस्तर झपाट्याने वाढतो. मात्र यंदा नदी पात्राच्या खोऱ्यात चांगला पाऊस झाला नाही.शेतकऱ्यांच्या सिंचनाकरिता व नागरिकांना पिण्याकरिता पुढील काळात या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. संततधार पाऊस सुरू राहीला तर धरण ओव्हरफ्लो झाल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा आहे. अशी सूत्राची माहिती आहे.



