सामाजिक कार्यकर्ते शरद मैंद यांच्या नेतृत्वात अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेले नुकसानग्रस्त शेतकरी १९ सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर विविध मागण्यासाठी धडकणार!
तालुक्यातील जास्तीत जास्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन!

पुसद: तालुक्यात ३१ऑगस्ट व १सप्टेंबर रोजी ढगफुटीसदृश अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.याअतिवृष्टीमुळे तालुक्यातील कोपरा, बोरी मच्छिंद्र, बोरगडी, बोरी मुखरे, कारला देव, सांडवा, मांडवा, भोजला, चोंढी, बान्शी, वडसद, माणिकडोह, धनसळ, श्रीरामपुर, धनकेश्वर, पार्डी, रोहडा, बेलोरा या व ईतर गावासह पुसद शहरांसह या मोठ्या प्रमाणात शेतकरी, व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले अनेक गावातील शेकडो एकर शेतजमीन पिकासह पुराच्या पाण्याने अक्षरक्षः खरडुन शेतात फक्त खड्डक आणि मोठे दगडांचे ढिग लागले . शेकडो गुरे, ढोरे, वाहुन गेली.गावांना जोडणारे रस्ते, पुल हे सुध्दा वाहुन गेले. पुरपरिस्थीती निवळताच लगेच भारती मैद पतसंस्था सामाजिक उपक्रम समिती अध्यक्ष तसेच पुसद अर्बन. बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी व त्यांचे इतर सहकाऱ्यांनी पुसद तालुक्यातील पुरग्रस्त भागांची प्रत्यक्षरित्या भेट देवुन पाहणी केली व पुरबाधितांना त्वरीत मदत म्हणुन अन्नधान्य, टिनपत्रे आणि आर्थिक मदत देण्यात आली.या दरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधून ज्या नाल्याओढ्यामुळे पूर आला त्यांचे युद्ध पातळीवर खोलीकरन, रुंदीकरण करून पूर्णप्रतिबंधक भिंत बांधण्यात यावी, पुरात घरं वाहुन गेली त्यांना घरकुल योजनेअंगर्तत त्वरीत घर बांधुन द्यावे, नुकसान ग्रस्त व्यवसायीकांना नुकसान भरपाई मिळावी,वाहून गेलेल्या पिकांची पूर्ण नुकसान भरपाई त्वरीत द्यावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व नागरिकांना भरपाईचा पूर्ण सरसकट विमा देण्यात यावा, उपजावु शेती ही वाहुन गेल्याने तिला विशेष पॅकेज अंतर्गत वहीती योग्य बनवून द्यावी किंवा लागणारा संपूर्ण खर्च देण्यात यावा, मार्ग बदलुन किंवा बांध फोडुन गेलेल्या सर्व नदी, नाले, ओढे यांचे सरळीकरण व पुर प्रतिबंधक भिंत बांधावी, सर्व विद्युत खांब वाहुन गेले त्या सर्व गावांना त्वरीत विद्युत पुरवठा सुरळीत करावा, सर्व रस्ते व पुल त्वरित बनवावे, ज्या शेतकऱ्यांची जनावरे दगावली किंवा वाहून गेली त्यांना त्वरीत नुकसान भरपाई किंवा त्वरित कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, पुरामुळे नुकसान झाल्याने कोपरा येथील समाधान संतोष पाईकराव या युवकाने आत्महत्या केली त्याच्या कुटूंबाला मद्त व पुनर्वसन विभागामार्फत तात्काळ अर्थीक मदत करण्यात यावी अश्या विविध मागण्याचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते तथा पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैद यांच्या नेतृत्वात त्यांचे सहकारी व पूरग्रस्त नागरिक १९ सप्टेंबर रोजी सकाळी पुसद अर्बन बँक तलाव ले-आउट पुसद येथुन सकाळी ११:०० वाजता उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर धडक देणार असून महसूल प्रशासना मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देणार असल्याची माहिती पुसद अर्बन बँक च्या सभागृहात नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषद मध्ये शरद मैंद यांनी दिली.तर मतदारसंघातील अन्य गावच्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की नुकसान ग्रस्त गावाच्या ग्राम पंचायत तर्फे नुकसान भरपाई चा ठराव तसेच सात बारा जोडलेले निवेदन दिले जाणार आहे. वरिल गावा व्यतिरिक्त ज्या गावात नुकसान झाले त्यांनी देखील १९तारखेला निवेदन घेऊन आल्यास त्यांना सहभागी करून घेता येईल असे आवाहन शरद मैंद यांनी केले.



