तुकाराम राठोड यांची यवतमाळ जिल्हा ग्राम पंचायत अधिकारी युनियन संघटनेच्या कार्याध्यक्षपदी अविरोध निवड!

पुसद : नुकतीच महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी. एन. ई. १३६, जिल्हा शाखा – यवतमाळ जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी यांची पंचवार्षिक निवडणूक सन २०२५/०२६ ते २०३०/०३१ दि २०जुलै २०२५ रोजी जिल्हा संघटना कार्यालय, यवतमाळ येथे मुख्य निवडणूक निरीक्षक तथा राज्याचे संयुक्त सचिव मा. कमलाकर वणवे साहेब, सह निवडणूक निरीक्षक तथा अमरावतीविभागाचे सहसचिव मा. चांद कुरेशी साहेब व निवडणूक निर्णय अधिकारी मा. माणिकराव मस्के साहेब यांच्या नेतृत्वात अविरोध पार पडली.सदर निवडणूक प्रक्रियेदरम्यान संघटनेच्या घटनेनुसार नियमानुसार सर्व आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून त्यात यवतमाळ जिल्ह्यातील संघटनेचे सन्मानिय तालुका अध्यक्ष / तालुका सचिव ( मतदार ) यांनी २०२५/०२६ ते २०३०/०३१ या पंचवार्षिक कालावधी करीता खालीलप्रमाणे जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली यावेळी पुसद तालुक्यातील कुशल संघटक तुकाराम राठोड यांची कार्याध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली. यावेळी यवतमाळ जिल्हा ग्राम पंचायत अधिकारी युनियन डी.एन१३६संघटनेचे अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यामध्ये कोअर कमिटीचे सदस्य राजेश साव एस.के.जाधव नानाभाऊ बंगळे प्रदिपराव ठाकरे विलास उपलेंचवार आर. डी. पाटील आर. डी. देशमुख दुर्गादास मुनेश्वर अमरावती जिल्हा सरचिटणीस आशिष भागवत आणि जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष, तालुका सचिव, सर्व तालुका कार्यकारिणी सदस्य, संघटनेचे निस्सीम कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.तुकाराम राठोड यांची. कार्याध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्यावर त्यांच्या हितचिंतकाकडुन अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.




