ईतर

फर्निचर दुकानातच युवकाने गळफास घेऊन संपविले जीवन!

वणी/प्रतिनिधी( शुभम कडू ) : शहरातील जत्रा मैदान परिसरातील रोशन बावणे (२१) यांचे फर्निचरचे दुकान असून फर्निचरचे साहित्य असल्याने रोशन दुकानातच रात्री झोपत होता. मंगळवारी रात्री रोशन दुकानात झोपला होता तर एक व्यक्ती दुकानाचे बाहेर झोपला होता. आज बुधवारी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान दुकानाचे बाहेर झोपलेला व्यक्ती दुकानाचे आत पाणी घ्यायला गेला असता त्याला रोशन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेची माहिती वणी पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले व घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मात्र रोशन ने आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास वणी पोलीस करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close