पाच हजाराची लाच घेताना आगार व्यवस्थापक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात!

पुसद : येथील बसस्थानकात आगार व्यवस्थापक वर्ग -२ पदावर कार्यरत असलेले लोकसेवकांनी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. आज बुधवारी (दि.४) डिसेंबर २०२४ रोजी पुसद बसस्थानकातील आगार प्रमुखाच्या कक्षामध्ये पंचासमक्ष ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.मंगेश निळकंठराव पांडे (वय ४८) रा.प्रोफेसर कॉलनी ता.पुसद जि. यवतमाळ असे या आगार व्यवस्थापकाचे नाव आहे.लोकसेवक आगार व्यवस्थापक यांनी कार्यालयातील तक्रारदार कर्मचाऱ्यांचे रोखीकरण रजेचे पैसे मंजुरी करिता स्वाक्षरी करण्याकरिता तक्रारदाराला पाच हजाराची लाच मागितल्याने तक्रारदाराने दि.३ डिसेंबर २०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यावरून बुधवारी लाच लुचपत विभागाच्या पथकाने यशस्वी सापळा रचून आगार व्यवस्थापक यांना त्यांच्याच कक्षामध्ये पंचासमक्ष रंगेहाथ पाच हजाराची लाच स्वीकारताना पकडण्यात आले असून त्यांना ताब्यात घेऊन आरोपींला पुसद येथील शासकीय विश्रामगृहात स्थानबद्ध करून चौकशी सुरू करण्यात आली. व पुसद शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक मारोती जगताप, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र, अमरावती, सचींद्र शिंदे, अपर पोलीस अधीक्षक, अमरावती, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे आणि पोलीस अंमलदार पोहवा अतुल मते, पोहवा जयंत ब्राम्हणकर, पोना सचीन भोयर, सुधीर कांबळे, इफाज काझी व चालक श्रेणी पोउपनि संजय कांबळे सर्व नेमणुक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांनी केली.असुन अशा कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ कार्यालयास दुरध्वनी क्रमांक ०७२३२- २४४००२ तसेच टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क कराण्याचे आव्हान पोलीस उप-अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांनी केले आहे.