ईतर

निवडणुकीच्या तोंडावर पुसद मतदारसंघातील गावागावातील मतदारांचे पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर;निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची चिंता वाढली!

पुसद: मतदारसंघात निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यात स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध नसल्याने थंडी,वारा, उन्हात अनेक गावागावातील लाहान बालकांसह पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो मजुरांचे स्थलांतर परजिल्ह्यांत व परराज्यांत कामांच्या शोधात वणवण भटकावे लागत आहे.हे दुष्टचक्र सुटणार तरी कधी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.मात्र एकीकडे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची चिंता वाढली आहे. मतदारांना गावातच कसे थांबवून ठेवता येईल, यासाठी उमेदवारांचा चांगलाच कस लागत आहे.स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षे उलटली तरीही पुसद मतदारसंघांतील नागरीकांना रोजगारासाठी वणवण भटकावे लागते.पुहद तालुका म्हटले की, बहुतांश भाग हा शेतमजुरांचा ओळखला जातो.याभागातुन बेरोजगार, गरीब, गरजू, मंजूर, अल्पभूधारक शेतकरी रोजीरोटी कमविण्यासाठी नागरीकांचे जथ्थेच्या जथ्थे परराज्यात व परजिल्ह्यातील पोटाची खळगी भरण्यासाठी जातात सटवाईने भाळी लिहिले असते अठराविश्व दारीद्र्याचा शाप म्हणावं असं त्यांत या अतिमागास उद्योगहिन तालुक्यात हाताला काम नाही, कोणतेही काम मिळण्याची आशा नाही.या भागात एमआयडीसीमध्ये नावाला एकही उद्योग सुरू नाही लघु औद्योगिक क्षेत्र असल्याने या ठिकाणी अनेकांनी अत्य अल्प दराने लिजवर भुंखड घेऊन ठेवले या भुंखडधारकांनी अनेक वर्षांपासून एकही उद्योग सुरू केले नाहीत नव्याने उद्योग सुरू करणाऱ्यांना प्लॉट उपलब्ध नसल्याने ते उद्योग सुरू शकत नाही ज्यांनी या क्षेत्रातील प्लॉट अडवून ठेवले अशांवर संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही.त्यामुळे पुढील प्रक्रिया रखडल्या आहेत एकंदरीत उद्योग, व्यवसायाची अशी अवस्था असल्याने या मतदारसंघातील तालुक्यात रोजगार निर्मितीला खिळ बसली आहे.बेरोजगारांच्या हाताला काम मिळना तर या भागात शासकीय, सहकारी कींवा खाजगी एकही मोठा उद्योग उभा करण्यात आला नाही काही युवक व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना कर्ज सुविधा, सबसिडी व शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही.भागभांडवला अभावी अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.अनेक सुशिक्षित युवक चाहविक्री,पानठेला, हॉटेल, व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करीत आहे. हाताला काम नसल्याने तालुक्यातील अनेकजण तेलंगणा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश किंवा राज्यातील नागपूर मुंबई अशा महानगरात कामे शोधायला जातात तर काही रोज मजूर कुणाच्या शेतात राबतात तर कुणाच्या घराची रखवाली करतात कुठे हमाली करतात तर कुठे इमारत बांधकामात ओजी वाहतात तर काही मजूर कापूस वेचणी, भाजीपाला लागवड, मिरची तोडणे, फळबाग पॅकेजिंग, वीटभट्टीच्या,ऊसतोडणीसाठी,

 तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मजूर राज्याबाहेर तसेच अन्य जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत. या कामगारांना आपल्या मूळगावी मतदानासाठी आणण्यासाठी गावागावातील पुढारी कामाला लागला आहे. त्यात आता आणखी एक संकट उभे राहिले आहे. गावात उरलेल्या मजुरांनी देखील ऐन निवडणुकीच्या तोंडावर स्थलांतर सुरू केले आहे. गावात हाताला काम मिळत नसल्याने पोटापाण्याच्या चिंतेने ते कामाच्या भटकंतीसाठी बाहेर पडले आहेत.उमेदवारांना चिंता पडली आहे की, माळ पठारावरील गावागावात लोक निवडणुकीच्या तोंडावर कामाच्या शोधासाठी शहराकडे स्थलांतरित होऊ लागल्याने उमेदवारांपुढे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.परंतु मतदाराच्या मते मतदान तर महत्त्वाचं आहे पण नोकरी तर पाहिजे ना. तसंही कुणीही निवडून आलं तरी आम्हाला कुठं काय मिळतंय! ही नोकरी केली तर पैसे मिळतील शिक्षणासाठी. शेतकरी बाप काही शिक्षणासाठी पैसे देऊ शकत नाही.” “कुणीपण निवडून आलं तरी शेतकऱ्यांसाठी गरीब मजुरांसाठी कुणीच काही करत नाही. अशी खदखद व्यक्त करत आहेत.पण या मजुरांना गावात आणण्याचे या उमेदवारापुढे नवे आव्हान असुन नव्याने स्थलांतरित मतदार रोखून ठेवण्यासाठी देखील उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे चित्र सध्या मतदारसंघात पाहावयास मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close