हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अनेक मान्यवरांनी वाहीली आदरांजली!

पुसद:महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित-धवल क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या१११व्या जयंतीनिमित्त ता.१ जुलै रोजी भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या भावस्पर्शी सोहळ्यात वसंतराव नाईक चौकात सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास चाहत्यांची मांदियाळी जमली.फुलांनी सजविलेल्या वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे
अध्यक्ष दीपक आसेगावकर, उपाध्यक्ष धनंजय सोनी,सचिव प्राचार्य डॉ. उत्तम रुद्रवार यांनी पुष्पहार अर्पण केला. प्रतिष्ठानचे पूर्वाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री डॉ. एन.पी. हिराणी,माजी आमदार विजय पाटील चोंढीकर यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली.
यावेळी समाजातील विविध घटक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.नाईक कुटुंबातील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक,सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी इंद्रनील नाईक,माजी नगराध्यक्ष डॉ. माधवी गुल्हाने,श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. वंदना वानखेडे,प्रतिष्ठानचे मार्गदर्शक प्रा. गोविंद फुके यांनी प्रतिमेचे पूजन करून वसंतराव नाईक यांना आदरांजली वाहिली.शेषराव पाटील जिनिंग प्रेसिंग चे अध्यक्ष विजयराव चव्हाण,यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अनुकूल चव्हाण,बाबासाहेब नाईक सूतगिरणीचे अध्यक्ष श्याम मस्के पाटील,विनोद जिल्हेवार, आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष राधेश्याम जांगिड,प्रा. शिवाजी राठोड,बी.जी. राठोड,दयाराम चव्हाण, माजी नगरसेवक भवरसिंह सिसोदिया, रतिराव राऊत,क्रांती कामारकर,दिगंबर जगताप,प्राचार्य डॉ. गणेश पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. प्रल्हाद वावरे,श्रीकांत चव्हाण,प्रा. संजय चव्हाण,प्रा. उल्हास चव्हाण,नरेंद्र जाधव ,कौस्तुभ धुमाळे,अभिजीत पानपट्टे, देवेंद्र खडसे, शेख कयूम, नगर पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत वायकोस,नायब तहसीलदार कदम,पुसद पत्रकार संघाचे अनिल चेंडकाळे,माजी अध्यक्ष प्रा. दिनकर गुल्हाने, दीपक महाडिक, अध्यक्ष नाईक प्रतिष्ठानचे कार्यकारी अधिकारी उत्तम जाधव,या कार्यक्रमाला दिलीप पारध, श्रीराम पवार, सुधाकर ठाकरे, ज्ञानेश्वर तडसे,ॲड. रमेश पाटील, शिवाजी देशमुख सवनेकर, वसंतराव पाटील कान्हेकर, नारायण क्षीरसागर, तहसीलदार महादेव जोरवर, सहा. बीडीओ संजय राठोड, रमेश सरागे, प्रा. विजय राठोड यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
फळझाड रोपट्यांचे वाटप…!
आदरांजली कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांना वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने फळ झाडांच्या रोपट्यांचे वाटप करण्यात आले.पेरू, लिंबू यासारखी फळझाडांची रोपटी लावूनपुढील काळात फळे रसाळ गोमटी मिळतील,अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.या फळझाडांचे योग्य संगोपन करावे,असे आवाहन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष धनंजय सोनी यांनी केले.भूमिपुत्राला शेतकरी नेते राजु शेट्टी नतमस्तक..
गहुली येथून वसंतराव नाईक कर्जमुक्ती आंदोलनाची सुरुवात करण्यासाठी उपस्थित झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पूर्णाकृती पुतळ्याचे सकाळी दर्शन घेतले व शेतकऱ्यांचे भले करणाऱ्या महामानव वसंतराव नाईक यांना अभिवादन केले.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते मनीष जाधव,प्रवेश अध्यक्ष संदीप जगताप,किसन कदम, रावसाहेब अडकिने,प्रा. शंकर राजेगोरे,डॉ. प्रकाश पोफळे व त्यांचे सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते.