क्राइम

पोलीस भरती प्रक्रीयेत प्रकल्पग्रस्ताचे बनावट प्रमाणपत्र तयार करून देणारा मुख्य सुत्रधार पोलीसांच्या जाळयात-पो.स्टे. दराटी व स्था.गु.शा. यवतमाळची संयुक्त कारवाई!

यवतमाळ:चालु वर्षात महाराष्ट्र शासनाकडुन प्राप्त निर्देशाप्रमाणे पोलीस दलातील सर्व घटकांमध्ये चालक पोलीस शिपाई व पोलीस शिपाई भरती २०२१ प्रक्रीया राबविण्यात आली त्याअनुषंगाने यवतमाळ जिल्हा पोलीस घटकात सुध्दा चालक शिपाई ५८ व पोलीस शिपाई २४४ या पदांकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात आली. सदर पोलीस भरती दरम्याण प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त तसेच इतर आरक्षणाचा फायदा घेवून पात्र उमेदवारांचे प्रमाणपत्र पडताळुन घेण्याबाबत निर्देश मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी सर्व पोलीस घटकांना दिले होते. त्या अनुषंगाने यवतमाळ घटकातील उपरोक्त प्रमाणपत्रांचा लाभ घेणारे ०४ उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आली असता किशोर किसन तोरकड रा. बोरी वन ता. उमरखेड जि. यवतमाळ यांचे प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे निदर्शनास आल्याने मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या आदेशाने दराटी पोलीस स्टेशन येथे अप.क्रमांक १५/२०२३ कलम ४१९, ४२०, ४६७.४६८, ४७९ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्यात वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली आरोपी किशोर किसन तोरकड रा. बोरी वन ता. उमरखेड जि. यवतमाळ यास दि.२६मे२०२३ रोजी अटक करण्यात आली असून त्यास दि.३०मे२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मा. न्यायालयाने मंजुर केला असल्याने त्याचेकडे तपास केला असता त्याला सदरचे प्रमाणपत्र हे वाशी जिल्हा सोलापुर येथील शिक्षक नवनाथ शहाजी कदम यांनी तयार करुन दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली भरत चापाईतकर ठाणेदार दराटी व सागर भारस्कर पोउपनि स्था.गु.शा. यांची दोन पथके तयार करुन बार्शी येथे पाठविण्यात आली त्यांनी सदर आरोपीचा शोध घेवून त्यास नाव्यात घेतले आहे. तसेच त्याचेकडुन मिळालेल्या माहिती वरुन इतर निष्पन्न आरोपी यांचा शोध घेणे कामी पथक रवाना करण्यात आले आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ.पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पीयुष जगताप, प्रदीप परदेशी पो.नि. स्थागुशा, यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सपोनि भरत चापाईतकर, ठाणेदार दराटी, पोउपनि सागर भारस्कर, स्था.गु.शा. यवतमाळ पो. अंमलदार संभाजी केंद्रे, आडे, ऐलगीर पो.स्टे. दराटी, सोहेल मिर्झा, ताज मोहमद स्थागुशा यांनी सायबर पो.स्टे. यवतमाळ यांचे मदतीने यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close