क्राइम

खैरखेडा येथील शासकीय आश्रमशाळेचा मुख्याध्यापक१ हजार ५००रुपयाची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात!

पुसद : तालुक्यातील माळ पठारावरील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खैरखेडा येथील शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापकांनी १ हजारांची ५०० रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.  लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यानंतर कारवाई करीत त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. गौरीशंकर प्रभाकर सैदाणे असे या मुख्याध्यापकांचे नाव असून याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन खंडाळा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत लाचलुचपत विभागाच्या सूत्रांनी ‘झेप न्यूज’ ला दिलेली माहिती अशी की, पुसद तालुक्यातील माळ पठारावरील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खैरखेडा येथील शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापकांनी तक्रारकर्त्याकडे लाचेची मागणी केली असता त्यांच्या भ्रमणध्वनीवर वरील संभाषणाची पडताळणी करीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत शासकीय आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. सदर मुख्याध्यापक हा वैद्यकीय खर्चाच्या बिलाला मंजुरी देण्यासाठी १ हजार ५००रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. ही संपूर्ण कारवाई पुसद येथील विश्रामगृहात पार पडली.खंडाळा पोलीस स्टेशन येथे लोकसेवा विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे.या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा गंभीर प्रकार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.या कारवाईचा अधिकचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे. सदरची कार्यवाही बापु बांगर, पोलीस अधीक्षक,ॲन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र, अमरावती, सचींद्र शिंदे, अपर पोलीस अधीक्षक, अमरावती, पोलीस उपअधीक्षक जगदिश परदेशी ॲन्टी करप्शन ब्युरो, वाशिम व पोलीस उपअधीक्षक श्री. अभय आष्टेकर, ॲन्टी करप्शन ब्युरो, यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती अल्का गायकवाड ॲन्टी करप्शन ब्युरो, वाशिम, पोलीस निरीक्षक मनोज ओरके ॲन्टी करप्शन ब्युरो, यवतमाळ आणि पोलीस अमलदार पोहवा योगेश खोटे, चापोशि मंगेश देवकते नेमणुक ॲन्टी करप्शन ब्युरो वाशिम, पोलीस अंमलदार पोहवा अतुल मत्ते, अब्दुल वसीम, सुधीर कांबळे, पोना सचीन भोयर, राकेश सावसाकडे, पोशि भागवत पाटील, सुरज मेश्राम, चालक पोना अतुल नागमोते नेमणुक ॲन्टी करप्शन ब्युरो, यवतमाळ यांनी केली आहे.तसेच नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

जर शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत ॲन्टी करप्शन ब्युरो यवतमाळ कार्यालयास दुरध्वनी क्रमांक ०७२३२-२४४००२ तसेच, मोबाईल क. ८९७५७९१०६४ किंवा टोल फि क्रमांक १०६४ वर संपर्क करण्याचे आव्हान पोलीस उप-अधिक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, यवतमाळ यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close