राजकिय

पुसदमध्ये नपच्या निवडणुकीत भाजपच्या बंडखोर रेश्मा लोखंडे ह्या भाजपच्या अधिकृत उमेदवाराचे भवितव्य बिघडू शकतात! “ना खाऊंगी ना खाने दूंगी” 

पुसद : विधानसभा निवडणुकीतील यशानंतर नरपालिकेतही विजयाची आशा निर्माण झाली होती परंतु महायुती अभंग राहील असा कयास व्यक्त केला जात होता. महायुती अबाधित राहावी यासाठी भाजपाचे माजी आमदार ॲड.निलय नाईक यांनी महायुतीतील तीन्ही घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्या सोबत अनेक बैठका झाल्या. वेळोवेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासमावेत बैठका होऊन तोडगाही ठरला नाही.अखेर महायुती तुटली व भाजपने स्वबळावर निवडणूक लढविण्याचे ठरवले परंतु भाजपमध्ये नगराध्यक्ष पदासाठी दावेदार असलेल्या अनेक उमेदवारांना संधी मिळाली नसल्याने त्यामधील भाजपच्या महिला पदाधिकारी रेश्मा लोखंडे शिंदे यांनी बंडखोरी करीत चक्क नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार अनोख्या शकला लढवतायत. त्यातच पुसद नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी रेश्मा लोखंडे शिंदे या अपक्ष उमेदवाराने आयडियाची कल्पना केलीये. कायमच उमेदवार हे जनतेला आश्वासनं देतात आणि निवडले गेलेत की सर्व आश्वासनं पद्धतशीर विसरतात. हाच जनतेतील अविश्वास दूर करण्यासाठी अपक्ष उमेदवार रेश्मा लोखंडे शिंदे यांनी चक्क ५०० रुपयांच्या बाँडपेपरवर त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय.अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. माझा निवडणूक जाहीरनामा मी बाँडपेपरवर नोटरी करून जनतेला देत आहे. यातील आश्वासनं पूर्ण न केल्यास किंवा जाहीरनाम्यात नमूद केलेले मुद्दे त्यामध्ये शहर विकासाची दशसूत्री खालील प्रमाणे राहील.१) पहिल्या ६ महिन्यांत शहर अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम राबून कायदेशीर आणि मानवीय दृष्टिकोनातून योग्य पुनर्वसन करेल.२)गार्डन व ओपन स्पेसेसचे सुशोभीकरण करून उजाड झालेली गार्डन पुनर्जीवित करून ओपन स्पेसेसवर कचरा आणि बेकायदेशीर वापर बंद करेल.३) पूस नदी स्वच्छता – शहराचा श्वास परत मिळवणारी नदी स्वच्छता मोहीम, वॉकवे, लाईटिंग आणि नदीकाठ सुशोभीकरण. (पूद नदी पुर्नजिवनाचे काम मी या अगोदरही नाम फाऊंडेशन सोबत केलेले आहे.)४) मजबूत RCC रस्ते आणि पक्के नाले ठेकेदारांकडून १५ वर्षांची हमीचा नियम करून निकृष्ट कामांवर कारवाई करेल.५ ) नगरपालिका शाळांचे उत्कृष्टतेकडे रूपांतर उत्कृष्ट शिक्षण – उत्कृष्ट भवितव्य” हा उपक्रम राबवणार.६) पाणी पुरवठा विभागात सुधारणा आणि जबाबदारी निश्चिती करून तीन पाण्याच्या टाक्यांपैकी दोनच चालू व एक बंद आहे हा भ्रष्टाचार संपवणार, दोषीवर सरळ गुन्हे दाखल करणार ७) शॉपीगला गेलेल्या महिलांसाठी बाजारात स्वच्छ व सुरक्षित टॉयलेटची आणी पार्किंगची व्यवस्था करेल,त्यांचा शॉपिंग दरम्यानचा वर्षानुवर्षाचा छळ संपेवेल. सोबतच वाहनांची पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देणे,८) नवीन आधुनिक नगरपालिका इमारत नागरिपालीका भिमुख, डिजिटल सुविधा असलेली नवीन प्रशस्त इमारत बांधणार, ९) वृद्ध आणि बालकांसाठी स्वतंत्र सुविधा वरिष्ठ नागरिकांसाठी क्लब हाऊस सह, बाल संस्कार वर्ग व जुने सभागृह उपलब्ध करून देइल.१०) महामाणवानच्या पुतळ्यांचे व पुतळ्याच्या परिसराची स्वच्छता नियमित करून, एकातरी महामानव असणाऱ्या महिलेचा पुतळा पुसद मध्ये लवकरात लवकर उभा करेन. असे शपथपत्र रेश्मा गजानन लोखंडे स्टॅम्प पेपरवर मतदार राजाला लिहून दिले आहे व “ना खाऊंगी ना खाने दूंगी” या तत्त्वावर काम करत राहील, कार्यात कसूर केल्यास जनता जनार्धन म्हणेल तेंव्हा राजीनामा देईल.असे आश्वासन सुद्धा दिले आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close