राजकिय

राजश्री पाटील यांच्या पराभवाने महायुतीच्या सात आमदारांचे वाढले ‘टेंशन?विधानसभेत गणित बिघडणार?

पुसद : यवतमाळ-वाशिम हा लोकसभा मतदारसंघ निर्मितीपासून हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. राज्यातील बदललेल्या समीकरणानंतर महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी दुहेरी लढत होत असली तरी यावेळी प्रथमच शिवसेनेतील दोन्ही गट या लोकसभेत आमने-सामने आले होते.शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात होणाऱ्या या लढतीत कोण बाजी मारते याची राजकीय संपूर्ण राज्यात उत्सुकता होती. यवतमाळ- वाशीम लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी महायुतीचे सात आमदार असतानाही शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांचा पराभव झाला. हा पराभव महायुतीच्या नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री संजय राठोड, भाजपचे आमदार मदन येरावार ॲड.निलय नाईक, राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक, या दिग्गजांची प्रतिष्ठा या पराभवाने धुळीस मिळाल्याची चर्चा आहे.तर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळातून आचारसंहितेपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारास सुरूवात केली होती. सौ.राजश्री हेमंत पाटील यांना ऐनवेळी उमेदवारी मिळाली. सोबतच त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षाच्या स्थानिक आमदारांवर सोपवली गेली. यवतमाळ- वाशीम लोकसभा मतदारसंघात यवतमाळ, राळेगाव, दिग्रस, पुसद, कारंजा आणि वाशीम या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता यातील यवतमाळमध्ये भाजपचे मदन येरावार, राळेगावमध्ये प्रा. अशोक उईके (भाजप), दिग्रसमध्ये संजय राठोड (शिवसेना शिंदे), पुसद येथे इंद्रनील नाईक (राकाँ अजित पवार), कारंजामध्ये भाजपचे दिवंगत राजेंद्र पाटणी हे आमदार होते, तर वाशीममध्ये भाजपचेच लखन मलिक हे आमदार आहेत. याशिवाय विधान परिषदेचे आमदार ॲड.निलय नाईक (पुसद) हे भाजपचेच आहेत. या सर्व सत्ताधारी आमदारांवर महायुतीच्या उमेदवारास निवडून आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. ज्या सत्ताधारी आमदाराच्या मतदारसंघात उमेदवाराचे मताधिक्य कमी होईल, त्या आमदारास विधानसभा निवडणुकीत तिकीट देण्याबाबत विचार केला जाईल, असा धमकी वजा इशाराही देण्यात आला होता. निवडणूक काळात शिवसेनेचे स्टार प्रचारक व फिल्मस्टार गोविंदा यांची सुद्धा रॅली काढण्यात आली स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार मतदारसंघात दौरा केला. एक दिवस मुक्काम केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतल्या. तरीही यावेळी जनतेने सत्ताधारी भाजप, शिवसेना, राकाँला झिडकारल्याचे चित्र आहे.लोकसभा मतदारसंघात समाविष्ट सहा ही विधानसभा मतदारसंघात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीचे उमदेवार संजय देशमुख यांनी पुसद वगळता राळेगाव, दिग्रस, कारंजा, वाशीम, यवतमाळ या विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य घेतले. संजय देशमुख यांना राजश्री पाटील यांच्यापेक्षा वाशीम विधानसभा मतदारसंघात ३९ हजार ७३९, कारंजा – २० हजार ९६२, राळेगाव – २४ हजार ५९७, यवतमाळ – २ हजार ५३८ तर दिग्रस विधानसभा मतदारसंघात ८ हजार ८६७ मतांची आघाडी आहे. केवळ पुसद विधानसभा मतदारसंघात राजश्री पाटील यांनी ३ हजार १९८ मतांची आघाडी घेतली.दिग्रस हा पालकमंत्री संजय राठोड यांचा मतदारसंघ आहे, तर राळेगाव भाजपचे आमदार, माजी आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांचा मतदारसंघ आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावमध्ये संजय देशमुख यांनी घेतलेली मतांची आघाडी ही भाजपासाठी व महायुतीसाठी चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. वाशीम आणि कारंजा येथेही भाजपचे आमदार असल्याने तेथेही भाजपने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. राजश्री पाटील यांचा पराभव महायुतीच्या जिव्हारी लागणारा आहे. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या विद्यमान खासदार असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐनवेळी येथे राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली. मात्र नागरिकांनी येथे महायुतीला नाकारले. सत्ताधारी पक्षाचे सात आमदार असून एकही आमदार महायुतीच्या उमदेवाराला मताधिक्य मिळवून देऊ शकले नसल्याने या सर्व आमदारांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.भावना गवळी यांनाच येथे उमदेवारी दिली असती तर कदाचित चित्र वेगळे असते, अशी चर्चा सुध्दा सुरू आहे.राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी आमदारांचा फौजफाटा होता. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजप आणि शिवसेना शिंदे व राष्ट्रवादीचे आमदार असतानाही आघाडी घेता आली नाही. पुसदचा अपवाद वगळता राजश्री पाटील यांनी कुठेही मोठी आघाडी घेता आली नाही.या पराभवामुळे महायुतीच्या सात आमदारांच टेन्शन वाढलं असून विधानसभेला काय होणार? यवतमाळ हे राजश्री पाटील यांचे जन्मगाव आहे. त्यामुळे माहेरची जनता आपल्याला निवडून देईल, हा विश्वास राजश्री पाटील यांना पहिल्या दिवसापासून होता. शिवाय त्यांनी निवडणूक यंत्रणाही जोमाने कामाला लावली होती. त्यांनी कमी कालावधीत मोठी मजल मारली. मात्र येथील जनतेचा व मित्र पक्षांचा विश्वास संपादन करण्यात त्यांना अपयश आले.शिवाय विरोधकांनी राजश्री पाटील या बाहेरच्या उमेदवार आहेत, असा प्रचार केला आणि तो ग्रामीण भागात महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडला. तसेच भाजप, मोदी आणि फडणवीस यांच्याबद्दल असलेली नाराजी मतदानातून दिसून आली. त्याचा फटकाही पाटील यांना बसला.परंतु प्रभावाचे दुसरे कारण म्हणजे  काही महिन्यापूर्वी हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड शासकीय वैद्यकीय हॉस्पीटलचे डीन आदिवासी समाजाचे डॉ. वाकोडे आणि बंजारा समाजाचे डॉ.राठोड यांना शौचालय साफ करायला लावल्याने आदिवासी समाजाच्या रोषाला हेमंत पाटलांच्या पत्नीला समोर जावे लागल्याने मोठा धक्का बसला.शिवाय विरोधकांनी राजश्री पाटील या बाहेरच्या उमेदवार आहेत, असा प्रचार केला आणि तो ग्रामीण भागात महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडला. तसेच भाजप, मोदी आणि फडणवीस यांच्या फोडाफोडीच्या राजकारणा बद्दल असलेली नाराजी मतदानातून दिसून आली. त्याचा फटकाही पाटील यांना बसला. तर दुसरीकडे खासदार भावना गवळीं याचं तिकीट कापलं आणि राजश्री पाटील यांना मैदानात उतरवलं. त्यामुळे नाराज असलेल्या भावना गवळींनी त्यांचा प्रचार मनापासून केला की नाही,तर मतदारसंघात देशमुख, मराठा, कुणबी मताचे प्राबल्य असले तरी मागासवर्गीय, आदिवासी व मुस्लिमांची मते निर्णायक ठरली आहेत. त्यामुळे शिंदे शिवसेनेच्या राजश्री पाटील यांचा पराभव झाल्याचे दिसून आले.व महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख यांनी विजय मिळविला आहे.ही लोकसभेची निवडणूक लढत अतिशय रोमहर्षक झाली. प्रत्येक फेरीनंतर अन् प्रत्येक तासाला चित्र बदल होते.या लोकसभेच्या मतदारसंघात राजश्री पाटील यांचा विजय होईल, असा अनेकांचा अंदाज होता. त्याला कारणेही तशीच होती. राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री, महायुतीचे सगळे घटक पक्ष सात आमदारांचा फौजफाटा होता. बलाढ्य उमेदवार पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजप आणि राष्ट्रवादीचे आमदार असतानाही राजश्री पाटील यांना आघाडी घेता आली नाही. पुसद शहराचा अपवाद वगळता यांना कुठेही मोठी आघाडी घेता आली नाही लोकसभा निवडणुकीत राजश्री पाटील यांच्या मागे सात आमदारांचा फौजफाटा होता. डबल इंजिनच्या सरकारने जिवाचं रान केले होतं, त्यामुळे महायुतीला हा विजय सहज मिळेल असं म्हटले जात होते. पण एवढी मोठी शक्ती उभारून सुद्धा राजश्री पाटलांच्या पदरी निराशाच आली. लोकसभेतील पराभवानंतर महायुतीच सरकार अलर्ट मोडवर गेल्यामुळे राजश्री पाटील यांच्या पराभवानंतर महायुतीतील सात आमदारांचं टेन्शन वाढला असून येणाऱ्या काळात विधानसभेत अनेकाचे गणित बिघडणार असल्याची चर्चा लोकसभा मतदारसंघात सुरू झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close