सामाजिक

‘ताशाचा आवाज तरारा झाला, गणपती माझा नाचत आला; पुसद शहरात बाप्पाचे वाजत-गाजत आगमन!

पुसद : येणार.. येणार.. म्हणून भक्तगण ज्यांची आतुरतेने वाट बघत होते, त्या लाडक्या बाप्पांचं बुधवार (दि.२७) प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.शहरांसह ग्रामीण भागात घरोघरी आणि विविध सार्वजनिक मंडळात जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालं. ढोल-ताशांच्या नादात आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात बाप्पाच थाटातआगमन ठिकठिकाणी झाले.तर शहरामध्ये मानाच्या गणपतीच्या आगमन ‘ताशाचा आवाज तरारा झाला, गणपती माझा नाचत आला, या गजरात झाले यावेळी भाविक भक्ती भावात न्हाऊन निघाले होते.

मागील काही दिवसापासून शहरासह ग्रामीण भागात पुढील १० दिवस गणपती बाप्पाच्या आगमनाने घराघरातील वातावरण सुंगधीत भक्तिमय होणार आहे. बाप्पाच्या आगमनाने नवचैतन्य संचारणार आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी शहरातील बाजारपेठांमध्ये मुंगी शिरायला वाव नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा सजावट साहित्याचे दर वाढले आहेत तरीही बाप्पाच्या स्वागतासाठी कशाचीही तमा न बाळगता बाजारात बाप्पाच्या भक्ताची जोरदार खरेदी सुरु आहे.

बाजारपेठामध्ये विविध सजावटीच्या वस्तूंनी भरुन गेल्या आहेत. अनेक ठिकाणी सजावटीच्या साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी उसळली आहे. लहानापासून ते ज्येष्ठापर्यंत सर्वांचा आवडता लाडका बाप्पाच्या आगमन जोरदार झाले आहे. पुसद शहरात गणेश उत्सवाची धामधूम पाहायला मिळतेय. गणेश भक्तांसाठी आवश्यक असणाऱ्या गणेश मूर्ती बाजारापेठेतील यशवंत रंगमंदिर स्टेडियम परिसर, मेन रोड, सुभाष चौक, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवाजी चौक, या दुकानांमधील स्टॉलवर गणेश मूर्ती उपलब्ध झाल्या असून यावर्षी गणेश मूर्तीच्या किंमती देखील वाढल्या आहेत. मातीच्याच मूर्तीची स्थापना करा असा आग्रह होत असताना मूर्ती विक्रीच्या स्टॉलवर देखील तसे फलक लावण्यात आले व मातीच्या मूर्तीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरात अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेश मूर्तीची स्थापना होणार आहे. तर ग्रामीण भागात एक गाव एक गणपतीची संकल्पना राबविली जात नसल्याचे चित्रआहे. प्रर्यावरन पुरक मातीच्या मूर्ती उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.तर अनेक सार्वजनिक गणेश मंडळाकडून विविध सामाजिक संदेश आणि सामाजिक देखावे साकारले जात आहेत. विविध भागातील गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे मुर्तीकारही गणेशाच्या मुर्तीवर अंतिम हात फिरवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्याचबरोबर गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या साहित्यांनीही बाजारपेठ सजली आहे.

गणेशाचे आगमन ते तारीख ६ सप्टेंबर श्रीची विसर्जन मिरवणूक संपे पर्यंत कोणत्याही डॉल्बी मालक, धारक तसेच गणेश मंडळाचे पदाधिकाऱ्यांना त्यांचे ताब्यातील डॉल्बी सिस्टीम वापरात किंवा उपयोगात आणण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच उपविभागीय  अधिकारी यांचेकडून आदेश काढण्यात आले असून संपूर्ण दहा दिवसांत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तिसरा डोळा आणि पोलिस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त राहणार असल्याची सूत्राची माहिती आहे. गणेशमूर्ती विक्रेत्यांकडे पहाटेपासूनच खरेदीदारांची रांग लागल्या होत्या, लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्साहात सहभाग नोंदवला. पर्यावरणपूरक मूर्ती व विविध आकर्षक सजावटींची विशेष मागणी यंदा पाहायला मिळत आहे.“गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषात मूर्ती घरी नेऊन स्थापना करतांना भाविक भक्तगण दिसुन येते होते.

गणपती बाप्पाच्या आगमन मिरवणुकीला सुरुवात झाली असून गणपती उत्सव मंडपाच्या दिशेने बाप्पा मार्गस्थ झाले. मोरया मोरयाच्या गजरात अवघा शहरातील अनेक रस्त्यांनी परिसर दुमदुमला आहे. आकर्षक फुलांनी सजविलेल्या रथातून, ट्रॅक्टर, ऑटो, गाड्याने गणपतीची आगमन मिरवणूक निघाल्या होत्या.व गणपती बाप्पाच्या मोठ्या उत्सव मंडपात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close