ईतर
दहावीमध्ये तालुक्यातून जान्हवी प्रथम, हिमानी द्वितीय, हर्षा तृतीय

वणी/प्रतिनिधी(शुभम कडू ) : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (SSC) दहावीचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. यावर्षीही निकालामध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. वणीतून लॉयन्स इंग्लिश मीडियम हायस्कूलची कु. जान्हवी संजय पांडे ही 95.60 टक्के गुण घेऊन तालुक्यात प्रथम तर वणी पब्लिक स्कूलची कु. हिमानी नीलेश चचडा ही 95.40 टक्के गुण घेऊन तालुक्यातून द्वितीय तर जनता शाळेतील कु. हर्षा विनोद ठमके 95.20 टक्के गुण घेऊन तालुक्यातून तृतीय आली आहे. वणी विभागातून वणी पब्लिक स्कूल, संताजी इंग्लिश मिडीयम स्कूल, भास्कर ताजने विद्यालय कळमना व राजश्री शाहू महाराज विद्यालय वणी या चार शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहेत. यावर्षी वणी तालुक्याचा निकाल 89.97 टक्के लागला आहे.



