विद्यार्थ्यांसाठी ‘तारे जमीन पर’ कार्यक्रमाची सुवर्णसंधी;नाईक फाऊंडेशन व पुसदच्या शिक्षण विभागाचा पुढाकार!

पुसद : ना.इंद्रनिल नाईक यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून शाळकरी विद्यार्थ्यांसाठी पुसद येथील सुधाकर नाईक प्रेक्षागृहात बुधवारी(ता.२८) ‘तारे जमिन पर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पुसद विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद व नगरपालिका शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना ह्या सुवर्णसंधीला लाभ देऊन त्यांच्यातील सुप्त गुणांना चालणा देण्यासाठी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.नाईक फाऊंडेशनच्या अध्यक्ष ॲड.मोहिनी नाईक यांच्या मार्गदर्शनात ना.अॅड.इंद्रनिल नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गेल्या दोन वर्षांपासून विशेष करुन ग्रामीण भागातील जि.प. व नगर परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार व्यासपीठातून त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कला-गुणांना वाव मिळावा यासाठी ‘तारे जमिन पर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.यावर्षीही नगराध्यक्ष ॲड.मोहिनी नाईक यांच्या मार्गदर्शनात नाईक फाऊंडेशन व पुसदच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन महाराष्ट्राची संत परंपरा /वारकरी संप्रदाय ,शेतकऱ्यांचे कैवारी वसंतराव नाईक, गोंधळ/ जागरण, ट्रीब्यूट टू मराठी सिनेमा, गाण सम्राज्ञी लता मंगेशकर, आदिवासी संस्कृती, शिवछत्रपतींचा महाराष्ट्र, महाराष्ट्राचे शिक्षण चळवळ— महात्मा ज्योतिबा /सावित्री, आमची माती आमची माणसं, महाराष्ट्राच्या लेकी, लावणी, भारतीय सैन्यातील महाराष्ट्राचे योगदान, मुंबई मेरी जान, कोळी नृत्य, संविधान कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर,बंजारा संस्कृती, स्वातंत्र्य लढ्यातील महाराष्ट्राचे योगदान, महाराष्ट्रातील सण —उत्सव, दादा कोंडके, भारुड, खेळाडूंचा महाराष्ट्र या एकवीस थिम्सवर आधारीत नृत्य व नाटिका सादर करण्यासाठी प्रत्येक शाळेने सहभागी होउन केंद्रस्तरावर सादरीकरण करावे व केंद्रस्तरावर निवड झालेल्या शाळांनी तालुकास्तरावर दर्जेदार कार्यक्रम सादर करावा.त्यासाठी किमान २० व कमाल ३० विद्यार्थी असावे व जास्तीत जास्त १० मिनिटांचे सादरीकरण करावे . प्रथम,व्दितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना सन्मानचिन्ह,खेळ क्रीडा कीट,स्कुल बॅग, एक्साम्पॅड, प्रमाणपत्र देण्यात येणार असून आयोजित कार्यक्रमात जास्तीत जास्त शाळा व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असे आवाहन पुसद नगर परिषदेच्या नगराध्यक्ष तथा नाईक फाऊंडेशनच्या अध्यक्ष अॅड.मोहिनी नाईक यांच्या मार्गदर्शनात पुसद पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी धिरज आडे यांचेसह शिक्षण विभागातील सर्व अधिकारी,मुख्याध्यापक,शिक्षक आणि ना.इंद्रनील नाईक मित्र परिवार यांनी केले आहे.



