शिक्षक दिननिमित्ताने चिंतामणी इन्स्टिट्युट तर्फे सैय्यद सलमान सरांचा शिक्षक सत्कार सन्मान

पुसद, :शिक्षक दिनानिमित्ताने आपल्या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुरुजींचा सन्मान म्हणून पुसद येथील शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या चिंतामणी इन्स्टिट्युट ऑफ सायन्स तर्फे पुसद सलग्न आपल्या शैक्षणक क्षेत्रात ठसा उमटिणाऱ्या शिक्षकांच्या पाठीवर प्रशंसेची थाप म्हणून शिक्षक सत्कार समारंभ ठेवण्यात आला.या मध्ये आपल्या सामाजिक आणि विशेषतः शैक्षणिक कार्यत नेहमी तत्पर असणारे मा. सैय्यद सलमान सरांचा सुद्धा शिक्षक सत्कर सन्मान करण्यात आला. सलमान सर हे नेहमी विद्यार्थांना करियर गाईडन्स करतात तसेच इयत्ता 8वी ते 12 पर्यंत च्या विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गर्शन करतात तसेच उर्दू माध्यमातील विद्यार्थांना करीता विशेष करून मराठी भाषेच्या जनजागृती करीता विशेष प्रयत्न करत असतात.तसेच समाजात सलोखा निर्माण व्हावा या उद्दशाने वेग वेगळ्या ठिकाणी व्याख्यान देऊन समाजात सामाजिक एकेपा, सद्भवना, राष्ट्रिय एकात्मता निर्माण करण्याचे प्रयत्न करतात.अशे अनेक सामाजिक आणि शैक्षणिक कार्य सलमान अरांचे नेहमी सुरूच असतात.अशा प्रकारे शिक्षक दिनाच्या निमित्ताने स्पनील सरांच्या चिंतामणि इन्स्टिट्युट तर्फे समाजातील आदर्श शिक्षकांचे सत्कार करण्यात आले.



