महाराजा अग्रसेन जयंती निमित्त कार्यक्रमांत स्वर्गरथ चे होणार लोकार्पण!

पुसद : महाराजा श्री अग्रेसेनजी जयंतीनिमित्त राजस्थान मंडळ पुसद व अग्रवाल मंडळ पुसदच्या वतीने अग्रवाल मंगल कार्यालय येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.दि.१४ ऑक्टोंबर २०२३ शनिवार ला नाण्यांची रांगोळी बनवणे , मक्याचे नमकीन व्यंजन , विलायची ची माळा बनवणे, माचिस मॅजिक, बेस्ट आउट आॕफ वेस्ट, एक मिनिट स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, डान्स स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच रविवार दि.१५ ऑक्टोंबर २०२३ रोजी मथुरा एवं वृंदावनवासी कलाकारांन द्वारे रासलीला प्रस्तुत होणार आहे व रात्री ९:३० ला महाराजा श्री अग्रसेनजी यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती होणार आहे.तसेच महाराजा अग्रसेनजी यांच्या जयंतीनिमित्त पुसद अग्रवाल मंडळ यांच्याद्वारे तयार करण्यात आलेले स्वर्गरथ लोकार्पण कार्यक्रम होणार आहे.
राजस्थान मंडळ पुसद चे अध्यक्ष चंन्द्रकान्त गजबी , सचिव अँड. विनोद पनपालीया तसेच अग्रवाल मंडळ पुसद चे अध्यक्ष कैलास अग्रवाल, कार्याध्यक्ष संतोष अग्रवाल, सचिव धीरज बगडे, कोषाध्यक्ष कैलाश गजबी, उपाध्यक्ष संजय बजाज, वैभव बजाज, सहसचिव निलेश अग्रवाल, रुपेश गजबी, प्रसिद्धी प्रमुख रूपेंद्र अग्रवाल, सांस्कृतिक सचिव रुबीन अग्रवाल, सदस्य गणेश अग्रवाल, अनिल अग्रवाल, राजकुमार अग्रवाल, सुनील मोर, राजेश बजाज, दीपक पिरथानी, अखिल पोद्दार, ज्योतींद्र अग्रवाल, सल्लागार समितीचे चंद्रकांत गजबी , प्रा. सुनील अग्रवाल, संजय गजबी, श्यामभाऊ पोद्दार ने कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आव्हान केले आहे तथा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत.



