सुधा मूर्तीच्या साहित्यातून सकारात्मक जीवनाची दिशा मिळते-प्रा.डॉ.अंजली लांडगे (पांडे);सुधाकरराव नाईक स्मृती व्याख्यान पुष्प

पुसद :श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद व विदर्भ साहित्य संघ शाखा पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री जलसंधारणाचे प्रणेते रसिकाग्रणी कै. सुधाकरराव नाईक यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त आयोजित स्मृती व्याख्यान पुष्पात प्रमुख वक्ते प्रा.डॉ. सौ. अंजली लांडगे (पांडे) इंग्रजी विभाग प्रमुख श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय पुसद यांनी सुधा नारायण मूर्ती यांचे बद्दल वरील गौरवोद्गार काढले.
व्याख्यानपुष्पाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एन.पी. हिराणी (अध्यक्ष विदर्भ साहित्य संघ शाखा पुसद) तर विजय पाटील चोंढीकर (कार्याध्यक्ष विदर्भ साहित्य संघ शाखा पुसद) , डॉ. उत्तमराव रुद्रवार (सचिव विदर्भ साहित्य संघ शाखा पुसद), दीपक आसेगावकर (कोषाध्यक्ष विदर्भ साहित्य संघ शाखा पुसद) ,प्रमुख वक्ते प्रा. डॉ. सौ अंजली लांडगे (पांडे) या विचारपीठावर उपस्थित होत्या. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज कै. सुधाकरराव नाईक दिवंगत लोकनेते देवराव बापू चोंढीकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्यानंतर साहित्य क्षेत्रातील निसर्ग कवि कै.ना. धो. महानोर, फुले शाहू आंबेडकर चळवळीचे पुरस्कर्ते कै. हरी रामचंद्र नरके, दैनिक लोकमतचे माजी संपादक कै.प्राचार्य मदन धनकर चंद्रपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रमुख वक्ते प्रा. डॉ. अंजली लांडगे (पांडे) यांचे स्वागत श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसदच्या सचिव सौ. अश्विनीताई अनिरुद्ध पाटील चोंढीकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व बुके देऊन करण्यात आले.
‘ मा. सुधा नारायण मूर्ती यांचे मूल्याधिष्ठित जीवन : एक चिंतन’ या विषयाच्या अनुषंगाने त्या आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाल्या की आजच्या धावपळीच्या युगात आपण सातत्याने भयभीत झालेले आहोत. कुठेही आणि कोणत्याही गोष्टीची आपल्याला शाश्वती वाटत नाही .जेव्हा आपण जगाकडे बघतो तेव्हा कुठेही सुखावह चित्र दिसत नाही मग तो भ्रष्टाचार असो चंगळ वाद असो सगळीकडे निराशा जनक वाटते पण आपण जेव्हा सुधा मूर्तीच्या साहित्याचे वाचन करतो तेव्हा त्यांच्या साहित्यातून निराशा जनक आयुष्य सुखी होण्याचा मूलमंत्र मिळतो आणि त्यांचे साहित्य हे मानवाला सुखी होण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे असा विश्वास मिळतो. त्यांच्या साहित्यातून मानवाला सकारात्मक जीवनाची दिशा मिळते .साधी राहणी व उच्च विचारसरणी चे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुधा मूर्ती होय. सदर व्याख्यान पुष्पाचे सूत्रसंचालन प्रा.गजानन जाधव तर प्रज्ञा गडदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. संगीत शिक्षक सारंग कोरटकर यांनी सरस्वती स्तवन सादर केले, याप्रसंगी श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद चे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर, , श्रीराम पवार,अविनाश देशमुख, सुधाकरराव ठाकरे,डाॅ.अमोल मालपाणी, विजय जाधव,,महेश खडसे, प्रा.गोविंदराव फुके, निळकंठ पाटील, बी.डी.ओ .संजय राठोड डाॅ.साहेबराव पाटील चौधरी , विनोद जिल्हेवार निखिल चिद्दरवार ,बाबाराव भेंडे , जे.डी.ढवळे, अॅड.रमेश पाटील आशिष देशमुख, डॉ. शैलेंद्र नवथळे, अभय राठोड, माजी प्राचार्य ताटेवार ,प्राचार्य गणेश पाटील, ,वामनराव देशमुख ,प्रा. गणेशराव रावते पत्रकार माधवराव पाटील ,अनिल चेंडकाळे, रवी देशपांडे व पुसद परिसरातील रसिक श्रोते तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या शाखेतील सर्व मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पत्रकार मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.



