ईतर

पुसद येथे धिक्कार मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

 

पुसद: शहरात शासकीय, निमशासकीय कर्मचारी, बेरोजगार, संघटित, असंघटित कामगार, सेवानिवृत्त कर्मचारी, शेतकरी व सर्व सामान्य नागरिकांनी प्रलंबित मागण्यांसाठी रविवारी (ता. २९) धिक्कार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

धिक्कार मोर्च्यात बेरोजगार तरुण सहभागी झाल्याने शहरातील सर्व अकरा अभ्यासिका रविवारी बंद होत्या. प्रलंबित मागण्या मंजूर होणार नाहीत तोपर्यंत हा लढा थांबणार नाही, असे तालुका निरिक्षक किशोर पोहनकर व तालुका निमंत्रक दिलीप कोलेवाड यांनी सांगितले.

मोर्चाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चाला पुसद पंचायत समिती कार्यालयापासून सुरू झाला.

शहराच्या मुख्य रस्त्यावरून मार्ग क्रमित तहसील कार्यालय येथे पोचला. मोर्च्यात मोठ्या प्रमाणावर आशा वर्कर, महिला व बेरोजगार तरुण दिसून आले. राज्य शासनाने मागण्या तत्काळ मान्य करून सरकारी कर्मचारी व इतरांना दिवाळीची गोड भेट द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

डीसीपीएस, एनपीएसधारक सर्व कर्मचाऱ्यांना जुनी एनपीएसधारक सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, सर्व क्षेत्रातील कंत्राटीकरण रद्द करुन कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात यावे, शिक्षकांची ५५ हजार रिक्त पदे एकाच टप्प्यात तातडीने भरण्यात यावीत, तसेच आकृतीबंधानुसार सर्व संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, स्पर्धा परीक्षांसाठी राजस्थान सरकारप्रमाणे किमान शुल्क आकारण्यात यावे.

ईपीएस-९५ अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांना दरमहा नऊ हजार व त्यावर महागाई भत्ता पेन्शन म्हणून देण्यात यावा. आदी मागण्या करण्यात आल्या. मोर्चासाठी तालुका सुकाणू समितीचे निमंत्रक दिलीप कोलेवाड, मुख्य संयोजक दीपक मेश्राम, संयोजक मधुकर मोरझडे, प्रदीप मोहटे, दीपक भवरे व अभिजित पाटील (बोरकर) यांनी धिक्कार मोर्चाचे नियोजन केले. शुद्धोधन कांबळे, अभिजित नवलकर, नागेश जोगदे, गजानन होंडे, ब्रह्मनंद राठोड, विजय मार्कड, राम अवचार, अंकुश देवकते, शरद काळे, संतोष मार्कड, सुयोग लकडे, संतोष दुर्गे, कैलास चांडक, ज्ञानेश्वर जाधव, चौरे, जय राठोड, एस. व्ही. राऊत यांच्यासह पुसद तालुक्यातील कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close