ईतर
सोयाबीन पीका वर रोगाचा प्रादुर्भाव उत्पादनात होणार मोठी घट

हिंगोली/प्रतिनिधी(शिवाजी कऱ्हाळे):तालुक्यांमध्ये सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन पिकामध्ये फार मोठि उत्पन्नात घटहोण्याचे चित्र सध्या दिसत आहे.यावर्षी हिंगोली तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी कापसाच्या पेऱ्या पेक्षा सोयाबीनचा पेरा जास्त केला होता.अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पिकाची फार मोठी निगा घेऊन सुद्धा.यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे यावर्षी सोयाबीन पिकाच्या उत्पन्नात फार मोठी घट होण्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे.यावर्षी पावसाचे प्रमाण हिंगोली तालुक्यात समाधानकारक नसल्याने.व सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव आल्याने यावर्षी शेतकरी मेटाकुटीला आला आहे.



