सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या अज्ञात महिलेस मुद्देमालसह २४तासाच्या आत अटक! -स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळची कारवाई!

यवतमाळ/प्रतिनिधी : दारव्हा शहरातील शीवम विजय पाले यांच्या शिवकृपा ज्वेलर्स या दुकानातून एका बुरखाधारी अज्ञात महीलेने दि.१९ऑगस्ट २०२५ रोजी सोन्याचे दागिने विकत घेण्याच्या बहाण्याने दुकानातुन ४जोड सोन्याचे लटकन वजन १२.६७०ग्राम किंमत अंदाजे ६० हजार रुपये चोरी करुन नेले होते. सदर चोरीची घटना ज्वेलर्सचे मालकाला लक्षात येता त्यांनी दि.२२ऑगस्ट २०२५ रोजी तात्काळ दारव्हा पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दाखल केली त्यावरून पोलिसांनी अपराध क्रं.५५६/२०२५ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध दाखल करून सदर घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्याकडे दिला त्यावरून स्थागुशाने तपासाची चक्रे फिरवली असता गोपीनय माहिती द्वारे आरोपी अकोला येथे असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी संशयित महिला मुमताज परवीन अब्दुल शकील(वय ६५, रा. नेहरूनगर जि.अकोला) या महिलेस ताब्यात घेऊन अटक केली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,दि.१९ ऑगस्ट २०२५ रोजी दिवसा दारव्हा शहरातील शिवम विजय पाले यांचे शिवकृपा ज्वेलरी दुकानामध्ये एका अनोळखी बुरखाधारी महिलेने ४ जोड सोन्याचे कानातील लटकन किंमत अंदाजे ६०,०००/- रुपये चोरी करुन नेले. सदरची घटना शिवकृपा ज्वेलरी दुकान मालक शिवम विजय पाले रा. दारव्हा यांचे लक्षात आल्यानंतर त्यांनी दि. २२ ऑगस्ट२०२५ रोजी पोलीस स्टेशन दारव्ह येथे येऊन दागिने चोरी झाल्याची तक्रार दाखल केली होती त्यावरुन दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी पोलीस स्टेशन दारव्हा येथे अपराध क्रमांक ५५६/२०२५ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेची माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास प्राप्त होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन समांतर तपास करीत असतांना गोपनिय बातमीदाराच्या माहितीवरुन नेहरु नगर जिल्हा अकोला येथुन संशयीत महिला मुमताज परविन अब्दुल शकील, वय ६५ वर्ष हिला ताब्यात घेऊन तिचेकडे कौश्यल्यपुर्वक चौकशी केली असता सदर आरोपी महिले कडुन गुन्हात चोरी गेलेले ०४ जोड सोन्याचे कानातील लटकन वजन १२.६७० ग्राम किंमत अंदाजे ६०,०००/-रुपये जप्त करण्यात आले. सदरचा मुद्देमाल पोलीस स्टेशन दारव्हा यांच्या ताब्यात देण्यात आला असुन पुढील तपास दारव्हा पोलीस स्टेशनचे पोलीस हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांचे मार्गदर्शनात सतिश चवरे, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. सपोनि पवन राठोड, पोलीस अंमलदार बबलु चव्हाण, कुणाल मुंडोकार, सोहेल मिर्झा, मिथुन जाधव, अमित झेंडेकर, जितेंद्र चौधरी सर्व स्थागुशा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.



