पुण्यश्लोक माता अहिल्याबाई होळकर जयंती दिनी सामाजिक कार्यकर्ते मारोतराव कांबळे यांचा सत्कार

पुसद :दि. ३१ मे रोजी पुसद येथील महिला बचत गटाच्या कार्यालयामध्ये पुण्यश्लोक माता अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सत्कार मूर्तीचे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.महिला आर्थिक विकास महामंडळ तथा महिला व बालविकास विभाग प्रमुख व्यवस्थापिका सौ अश्विनी पुनवटकर तथा पुसद विधानसभेचे आमदार यांच्या धर्मपत्नी सौ मोहिनी ताई इंद्रनील नाईक पोलीस स्टेशन वसंत नगर पुसदचे ठाणेदार प्रवीण नाचणकर पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय राठोड हे प्रामुख्याने उपस्थित होते.
पुण्यश्लोक माता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर प्रमुख पाहुण्यांनी प्रकाश टाकला या कार्यक्रमांमध्ये सामाजिक कार्यकर्ते मारोतराव कांबळे यांचा मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक सुद्धा उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरता महिला बचत गटांच्या महिलांनी परिश्रम घेतले. पुण्यश्लोक माता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.



