श्री शिवाजी विद्यालयाच्या विज्ञान नाटीकेची जिल्हास्तरावर निवड!तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात पटकविला प्रथम क्रमांक!

पुसद : स्थानिक श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुसद यांनी नवजीवन काॅन्हेंट येथे नुकत्याच संपन्न झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव २०२४-२५ मध्ये विज्ञान नाटीकेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. दि,१३ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित या नाट्योत्सव मध्ये वर्ग १० वा ई मध्ये शिकणाऱ्या खालील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.
त्यामधे अनुक्रमे सुप्रिया अनिलराव देशमुख, समिधा अजय रायके, गौरी विठ्ठलराव मारकड, राधिका किशोर देशमुख, श्रद्धा गजानन कानडे, ऋतुजा संजय सरगर, रोशनी सिद्धार्थ गडधने , प्रेरणा उमेश उबाळे . नाट्योत्सवाचा मुख्य विषय -*मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान* असून उपविषय,आरोग्य आणि स्वच्छता ,हा विषय घेऊन वरील विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर अशा नाट्याचे सादरीकरण केले, सोबतच सूक्ष्मजीवांचे फायदे आणि तोटे, आरोग्य विषयक स्वच्छता, संतुलित आहार ,पावसाळ्यात सूक्ष्मजीवांमुळे होणारे आजार, हा वैज्ञानिक दृष्टिकोन या नाट्यातून प्रदर्शित केला. यामधे शिवाजी विद्यालय पुसद च्या नाटिकेचा प्रथम क्रमांक येऊन त्याची जिल्हास्तरावर निवड झालेली आहे.,या नाट्याची स्क्रिप्ट स्वलिखीत होती. सदर नाट्य सादरीकरणासाठी विज्ञान मंडळाच्या प्रमुख सविता घाटगे यासह विज्ञान शिक्षिक प्रणिता मंदाडे, अल्का चव्हाण, जयश्री शेलार,भारत राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल सर्व सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या सचिव अश्विनीताई अनिरुद्ध पाटील चोंढीकर , प्राचार्य रामचंद्र हिरवे, पर्यवेक्षक प्रज्ञा गडदे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.



