श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात स्काऊटींग सुर्योदय व स्कार्फ दिवस साजरा स्काऊटींग वचन हा स्काऊटचा मुलगाभा आहे. – नितीमा रोकडे

पुसद: स्थानिक श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय पुसद येथे महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस आणि गाईड्स रोव्हर रेंजर युनिट च्या वतीने १ऑगष्ट हा स्काऊटींग सुर्योदय व स्कार्फ दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक नितीमा रोकडे (गोरे)स.शिक्षक राष्ट्रीय विद्यालय आडगाव तथा स्काऊटस गाईड्स तालूका प्रमुख यांनी वरील मार्मिक उद्गार काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विजय उंचेकर तर प्रमुख अतीथी म्हणून पर्यवेक्षक राम हिरवे, प्रा. अर्चना पाल, प्रा. विक्रम ठाकरे उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, लाॅर्ड बेडन पावेल, अन्नाभाऊ साठे, लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली.रोव्हर रेंजर लिडर प्रा. गजानन जाधव यांनी प्रास्ताविकात स्काऊटींग चे ध्येय व उद्देश नमुद केले.प्रमुख मार्गदर्शक नितीमा रोकडे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पुढे म्हणाल्या की स्काऊटींग ही निष्ठावान,स्काऊट गाईड निर्माण करणारी चळवळ आहे. बंधूभाव, आदरशिलता, निसर्गावर व प्राणीमात्रावर प्रेम करणे हे स्काऊटींग चे वचन आहे. त्यामुळेच रोव्हर रेंजर चे आचार विचार पवित्र बनतात. प्रमुख अतीथी राम हिरवे यांनी कला शाखेतून विद्यार्थांच्या कला गुणांना वाव मिळत असतो यातूनच उद्याचे समाजॠण फेडणारे अधिकारी तयार होतात. प्राचार्य विजय उंचेकर अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की स्काऊटींग हा विद्यार्थात चांगले गूण पेरणारा समाजोपयोगी उपक्रम आहे. त्याचा आपन लाभ घ्यावा. सदर कार्यक्रमाचे संचालन पल्लवी पवार तर प्राजक्ता पवार हिने आभार मानले. याप्रसंगी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्काऊटींग च्या वचनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. भाऊसाहेब देशमुख, प्रा योगिता काष्टे, प्रा. निलेश जाधव, पुजा साखरे, वैष्णवी कळसाईत, श्रद्धा मोहळे, शेख दानिश, यांनी पुढाकार घेतला.



