ईतर

श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय शिक्षण सप्ताह उत्साहात संपन्न!

पुसद :स्थानिक श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त २२ ते २८जुलै २०२४ या कालावधीत शालेय शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहात व हर्ष उल्हासात राबविण्यात आला.

शालेय शिक्षण सप्ताहाच्या विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक, मानसिक व सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शालेय शिक्षण सप्ताह राबविण्याचे निर्धारित केले होते या अनुषंगाने शिक्षण सप्ताहाच्या प्रत्येक दिवशी वैविध्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये सर्वप्रथम पहिल्या दिवशी शालेय शिक्षण सप्ताहाचे उद्घाटन मुख्याध्यापक तथा प्राचार्य विजय उंचेकर यांच्या हस्ते उप- मुख्याध्यापक आर व्ही हिरवे,वि. राऊत, शिवाजी ठाकरे, संतोष ठाकरे, पर्यवेक्षक प्रज्ञा गडदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

अध्ययन व अध्यापन साहित्य हा उपक्रम शिल्पा कदम व परसराम वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविताना यामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक अध्ययनाचे नाविन्यपूर्ण साहित्याची ओळख व त्याचे प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले, विविध शालेय साहित्याच्या मार्फत अभ्यास सोपा व्हावा विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवड निर्माण व्हावी याकरिता हा उपक्रम राबविण्यात आला.शिक्षण सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता हा उपक्रम प्रणिता मंदाडे व सचिन नालींदे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमात गणितीय संज्ञा आकडेमोड साक्षरता याविषयी माहिती सांगून प्रत्यक्ष साहित्यांच्या मदतीने गणिती अभ्यासक्रम अत्यंत सोप्या रीतीने पूर्ण करण्याची पद्धत व साक्षरतेचे महत्व या उपक्रमातून प्रभावीपणे सांगण्यात आले. शालेय शिक्षण सप्ताहाच्या तिसरा दिवस 24 जुलै रोजी विजय डोंगरे व मंगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्रीडा स्पर्धा तथा विविध खेळाचे आयोजन करण्यात आले यामध्ये खो-खो, कबड्डी ,लंगडी ,धावणे इत्यादी खेळांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर चौथ्या दिवशी प्रा गजानन जाधव व सारंग कोरटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक दिवस म्हणून विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी वेशभूषा, लघु नाट्य, देशभक्तीपर नृत्य, भारतीय संस्कृती दर्शन इत्यादी कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यात आला. शालेय शिक्षण सप्ताहाचा पाचवा दिवस म्हणजे कौशल्य व डिजिटल दिवस यामध्ये विद्यार्थ्यांच्या अंगी उपस्थित असलेल्या नाविन्यपूर्ण कला सादरीकरणाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला त्यामध्ये माती पासून किल्ले तयार करणे भांडी फळे तयार करणे टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे अशा विविध कलागुणांना वाव देण्यात आला व डिजिटल शिक्षण पद्धती विषयी डिजिटल शिक्षणाचे महत्त्व व त्याची उपयोगिता याबाबत प्रा निलेश जाधव व नितीन गायकवाड यांनी माहिती दिली. शिक्षण सप्ताहाचा सहावा दिवस लाईफ मिशनच्या दृष्टिकोनातून अविनाश देशमुख व भारत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली इको क्लब ची स्थापना करून विविध उपक्रम व शालेय पोषण आहार यामध्ये एक पेड मा के नाम या नाविन्यपूर्ण उपक्रमातून शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी प्रथमच विद्यार्थी व त्यांचे आई सोबत येऊन शालेय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झाले. शिक्षण सप्ताहाचा सातवा दिवस म्हणजे शिक्षण सप्ताहाची सांगता दिवस या दिवशी प्रा भाऊसाहेब देशमुख व उल्हास टाले यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय सहभाग तिथी भोजन या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना सकस आहार व गोड पदार्थाचा मनसोक्त आनंद घेता आला. अशाप्रकारे संपूर्ण विद्यालयात शालेय शिक्षण सप्ताहाच्या सर्व उपक्रमाचे यशस्वीपणे आयोजन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आले होते सदर कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन कार्यक्रमाचा व नाविन्यपूर्ण उपक्रमाचा आनंद घेतला हा संपूर्ण शिक्षण सप्ताह यशस्वी करण्यासाठी नोडल अधिकारी नितीन गायकवाड ,निलेश जाधव यासह विविध उपक्रमाचे प्रभारी शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close