ईतर

शिवशक्ती विद्यालयात स्वर्गीय पंजाबराव भोरे उर्फ भाऊसाहेब भोरे स्मृतिचिंतन व राज्य ग्रंथालय संघाचे राज्याध्यक्ष गजानन कोटावांर यांचा सपत्नीक सत्कार कार्यक्रम संपन्न!

यवतमाळ/प्रतिनिधी :-कळंब येथील शिवशक्ती विद्यालयाच्या स्वर्गीय भाऊसाहेब भोरे स्मृती सभागृहात भाऊसाहेब भोरे स्मृतिचिंतन व राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटावांर यांच्या सपत्नीक सत्कार व ग्रंथ तुला चे आयोजन ३० सप्टेंबरला करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक बाळासाहेब धांदे व्यवस्थापक शिवशक्ती शिक्षण संस्था कोठा (वेणी) कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती गजानन कोटावांर हे हजर होते भाऊसाहेब भोरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून व विद्यार्थिनीच्या सुंदर अशा स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रमुख पाहुण्यांच्या स्वागता नंतर प्रमुख अतिथी गजानन कोटावांर यांची ग्रंथ तुला व सत्कार करण्यात आला.

यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक ग्रंथालय संचालक ढोणे साहेब, यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी सह जिल्ह्यातून आलेले ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते, शिवशक्ती संस्थेचे संचालक, अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे सत्कारमूर्ती गजानन कोटावांर व बाळासाहेब धांदे यांनी स्वर्गीय भाऊसाहेब भोरे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्रवीण देशमुख सर तर आभार राजकुमार वाघ सर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close