ईतर

शिवरायांना शिवप्रभाची अनोखी मानवंदना! ‘छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु’ ह्या एक हजार पुस्तकाचे मोफत वितरण

 पुसद:छत्रपती शिवरायांच्या दूरदृष्टीचा, कर्तृत्वाचा, विचारांचा जागर व्हावा त्यातून युवकांना प्रेरणा मिळावी म्हणून शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्टने ‘ छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेन्ट गुरु’ हे पुस्तक तब्बल एक हजार तरुणांना मोफत वितरीत करण्याचा संकल्प करुन सध्यस्थितीत ५००पेक्षा जास्त पुस्तकांचे वितरण करुन शिवरायांना आगळ्या वेगळ्या पद्धतीने मानवंदना दिली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे वाचन चळवळ दिवसेंदिवस लोप पावत असल्याचे चित्र निर्माण होत असून वाचन चळवळीतून सक्षम पिढी घडविण्याच्या व छत्रपती शिवरायांचा विचार तरुणांनी अंगीकारुन केवळ स्वत:साठी नोकरी न करता इतरांच्या हाताला काम कसे देता येईल,सर्वांना सूखी कसे करता येईल. उद्योगशील युवकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील व्यवस्थापनाचे धडे मिळावेत या उदात्त हेतूने शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे चे संस्थापक अध्यक्ष अमोल साईनवार,विश्र्वस्त परशुराम नरवाडे व त्यांची संपूर्ण टीमने शिवरायांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यासाठी प्रा.नामदेवराव जाधव लिखित ” छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु” या पुस्तकांच्या इंग्रजी,हिंदी व मराठी भाषेतील एक हजार पुस्तकांच्या प्रति २९० रुपये या प्रमाणे खरेदी करुन छत्रपती शिवरायांच्या जयंती दिनापासून पुसद येथील बिरसा अकॅडमी,महाराजा अभ्यासिका,समर्पण अभ्यासिका, श्री गुरुपीठ अभ्यासिका,अरिहंत अभ्यासिकांमधील स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्‍या शेकडो विद्यार्थी युवकांना वितरीत केले आहेत तसेच अंजली वाचनालय,कर्मवीर दादासाहेब कन्नमवार वाचनालय, सरदार पटेल वाचनालय, नगर परिषद वाचनालय, साई वाचनालय राजुरा, जिल्हा चंद्रपूर,छत्रपती शिवस्वराज्य संस्था, आष्टी. तुलाणा येथील वाचनालय. शिव महोत्सव समिती, गोयेगाव तसेच सप्तखंजेरीवादक पंकजपाल महाराज यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमात विविध प्रश्ने विचारुन उत्तरे देणार्‍या युवकांना सध्यस्थितीत ५०० पेक्षा जास्त पुस्तकांचे मोफत वितरण केले असून दररोज वितरण सुरु असून तब्बल एक हजार पुस्तके वाटपाचे उद्दिष्ट लवकरच पूर्णत्वाला जाणार आहे.भविष्यातही हे कार्य अविरत सुरू राहणार आहे. या कार्यासाठी संजय साईनवार,नागेश मिरासे,सोहम नरवाडे व अनेक शुभचिंतकाचे सहकार्य लाभत आहे.या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close