Uncategorized

पुसद येथे छत्रपती शिवरायांची ३९६ वी जयंतीअठरापगड जातीचे मावळ्यांचा सहभागाने मोठ्या उत्साहात साजरी!पहाटेपासूनच शिवभक्तांची मांदियाळी!

जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने आसमंत दुमदुमूला!

पुसदःमहाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६वी जयंती गुरुवारी अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावात साजरी करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज हे कोण्या एका जातीचे अथवा धर्माचे नाहीत. त्यांनी अठरापगड जातीचे मावळ्यांना घेवुन संपूर्ण बहुजनांसाठी कार्य केले व रयतेचे राज्य निर्माण केले.

त्याच्या अनुषंगाने शहरात गेल्या अनेक वर्षांपासून परंपरा असलेल्या दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीद्वारा आयोजित छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ सकाळी ८:३० वाजता शिवपुजन व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी पहाटेपासूनच शिवभक्तांची मांदियाळी जमली होती ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने आसमंत दुमदुमूला..

छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीचे वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानंतर शिवजयंती उत्सव समितीचे संयोजक दिगांबर जगताप यांनी प्रास्ताविकात पुसदच्या शिवपर्व २०२६ या कार्यक्रमाचा आढावा सांगताना. म्हणाले की, पुसद शहरात दरवर्षी शिवजन्मोत्सव साजरा केला जातो.

दरवर्षी शिवसामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी ११ हजार विद्यार्थी शिवसामान्य ज्ञान स्पर्धेत सहभागी झाले होते त्यांनी सांगितले.

सामाजीक बांधिलकी जोपासण्याचे काम करण्यात येत आहे असे ते म्हणाले. सुरुवातीला ना. राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी आ. विजय पाटील चोंढीकर, नगराध्यक्षा मोहिनी नाईक,ॲड. माधवराव माने, शरद मैंद, ॲड. आशिष देशमुख, उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, अनिरुद्ध पाटील चोंढीकर, दिगंबर जगताप, दिपक आसेगांवकर, अशोक बाबर, सुरेश गोफणे, ॲड . विश्वास भोवरे,ताहेरखान पठाण, विजय जाधव, हरगोविंद कदम,ॲड. आदित्य माने,नितीन पवार, भारतअण्णा पेन्शनवार, सदबाराव मोहटे विजय जाधव यांनी शिवपूजन करुन मानवंदना दिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला. यानंतर राम देवसरकर, सदबाराव मोहटे, ॲड. रमेश पाटील, पंजाबराव देशमुख खडकेकर, जयवंतराव पाटील कामारकर, ॲड. रमेश पाटील, विनोद जिल्हेवार, रवि ग्यनचंदानी, बि.जी. राठोड, यशवंत चौधरी, डॉ. भानुप्रकाश कदम, शाहु काकडे, भगवान आसोले, वामनराव देशमुख,राजेश
सोळंके, राजु दुधे,सुधिर देशमुख, पंडीतराव देशमुख, किरण देशमुख,नारायण क्षीरसागर, नगरसेविका श्रीमती दिपाली जाधव, सौ.जयश्री,सौ. शुभांगी पानपट्टे, मो. इरफान,ॲड. उमाकांत पापीनवार,दिपक, काळे, ॲड.भारत जाधव, विठ्ठल खडसे, नाना जळगांवकर, प्रा.अजय क्षीरसागर, साहेबराव ठेंगे, प्रकाश पानपट्टे, प्राचार्य गणेश पाटील,साहेबराव ठेगे, अजय पुरोहित, चंद्रकांत ठेंगे, प्रविण कदम,यशवंत चौधरी, विनायक सेवकर, ई. मान्यवरांनी शिवपुजन करुन शिवरायांना मानवंदना दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गजानन जाधव व चंद्रकांत ठेंगे यांनी केले. तर आभार प्रकाश लामणे यांनी मानले.

सकाळी १० वाजता शहरातील वेग वेगळ्या मार्गावर भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली. दुपारी ३ वाजता शहरातील मुख्य मार्गाने शोभायात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी अग्रस्थानी होती. घोड्यावर स्वार छत्रपती
शिवाजी महाराज व मावळे तसेच राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी शोभायात्रेचे आकर्षण होते.

तसेच युवा जल्लोष ढोल पथकाने डोलताशांचे सादरीकरण करत महाराष्ट्राची परंपरा कायम ठेवली. राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त ढेमसा आदिवासी नृत्य, बंजारा लोकनृत्य शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरले.

सदर शोभायात्रा ही श्री शिवाजी विद्यालय पुसद पासुन प्रारंभ होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, नगीना चौक, चंद्रशेखर आझाद चौक, महात्मा गांधी चौक मार्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये रॅलीचा समारोप करण्यात आला. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने शिवप्रेमी व समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close