राजकिय

पुसद शहरातील नगरोत्थान पाणी पुरवठा योजनेसाठी शिवसेनेचेच मोठे योगदान- ॲड. उमाकांत पापिनवार

शिवसेना कधीही श्रेय घेत नाही!

पुसद:छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानणार्‍या शिवसेना पक्षाकडून ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या तत्त्वाचा अवलंब करण्यात येत आहे. समाजसेवेचे व्रत घेतलेल्या या पक्षाने सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नेहमी आवाज उठविला आहे. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे घेऊन जात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची शिवसेना काम करत आहे.आपल्या लोकसभा विभागाच्या खासदार भावनाताई गवळी यांनी वेळोवेळी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियांअंर्तगत पुसद शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्प योजनेसाठी पाठपुरावा केल्याने डिसेंबर २०२३ रोजी ६७.६० कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ही योजने कोणा एकाचे श्रेय नसून सर्वांनीच प्रयत्न केले असल्याची भूमिका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड.उमाकांत पापिनवार यांनी पत्रकार परिषद मांडली. मागील ४दिवसांपासून राष्ट्रवादी (अजित दादा गट ) व शिवसेना (शिंदे ) या महायुतीतील सरकार पक्षातील पदाधिकारी व नेत्यात पाणी पुरवठा योजनेच्या श्रेया वरून पोस्टर वॉर सध्या शहरात सुरू आहे परंतु हे पोस्टरवर युद्ध जनतेच्या हितासाठी आहे की नेत्याच्या व पदाधिकारी हितासाठी आहे याची मात्र चर्चा शहरात जोरात सुरू आहे. शिवसेना ही ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करते. खा. भावनाताई गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पुसद शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास निधी द्यावा म्हणुन वारंवार पत्राद्वारे मागणी केली. प्रशासकीय मान्यता मिळाली असुन आम्ही जनतेसाठी ही मागणी केली होती. त्यामुळे श्रेयवादाचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी माहिती शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे यवतमाळ जिल्हाप्रमुख ॲड. उमाकांत पापीनवार यांनी दिली. दि.१८ रोजी दीपसंध्या हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. प्रास्ताविक लक्ष्मणराव आगाशे यांनी केले. पत्रकार परिषदेत माहिती देतांना ॲड. उमाकांत पापीनवार म्हणाले की, नुकतीच पुसद पाणी पुरवठा योजनेस ६७ कोटी ६० लाख रुपये प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ही मान्यता मिळावी म्हणुन आ. इंद्रनिल नाईक व आ. निलय नाईक यांनी सुध्दा शासन दरबारी प्रयत्न केले. आम्हीही खा. भावनाताई गवळी यांच्या पुढाकाराने पुसद शहराच्या पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता मिळावी म्हणुन प्रयत्न केले. जनतेच्या सेवेसाठी आम्ही सदैव पाठपुरावा करतो. परंतु पुसद शहरामध्ये खा.भावनाताई गवळी बद्दल बोलल्या जात आहे की पाणी पुरवठा योजनेचे श्रेय घेत आहे. शिवसेना कधीही श्रेय घेत नाही. जनतेसाठी काम करते असे ते म्हणाले. सर्व नागरिक जे यामध्ये मागील मे- २०२२ पासुन आपला खारीचा वाटा देत आहेत. या योनजेस मंजुरात मिळावी म्हणुन तत्कालीन नगराध्यक्षा अनिता नाईक, उपाध्यक्ष डॉ. अकील मेमन, माजी पाणी पुरवठा सभापती राजु दुधे, विरोधी पक्षनेते निखिल चिद्दरवार, निरज पवार, पाणी पुरवठा समिती सदस्य व मी स्वतः पाणी पुरवठा सभापती यांनी मागणी केली होती. तसेच प्रशासन यंत्रणेतील तत्कालीन मुख्याधिकारी निर्मला राशीनकर, किरण सुकलवाड, सध्याचे मुख्याधिकारी अभिजीत वायकोस, प्रशासकीय अधिकारी माधव पाटील, भूषण चव्हाण, सलाऊद्दीन, गोदाजी जमदाडे या कर्मचाऱ्यांनी सुध्दा मेहनत घेतली. वरील प्रकल्प शासनाच्या मंजुरीकरीता गेल्यानंतर खा. भावना गवळी यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्याचबरोबर माजी मंत्री मनोहरराव नाईक, आ. निलय नाईक व आ. इंद्रनिल नाईक यांनी आपल्या परीने प्रयत्न केले. या योजनेस मान्यता देणारे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे सुध्दा त्यांनी आभार मानले. तसेच पत्रकार बंधुंचे सुध्दा योजनेस सहकार्य लाभले. त्यामुळे या योजनेचे आम्ही श्रेय घेत नसल्याचे ते म्हणाले. पुसद शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास ६७ कोटी ६० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. या योजनेतील महत्वाचे घटक अॅड. उमाकांत पापीनवार यांनी सांगितले. त्यामध्ये सन २०५५ पर्यंत लोकसंख्येचा विचार करुन ही योजना प्रतिमानसी १३५ लिटर प्रतिदिन याचा विचार करुन करण्यात आलेली आहे. या योजनेत पुसद शहरात १६९ कि. मी. ची पाईपलाईन होणार आहे. जुने कमीव्यासाची व पीव्हीसी पाईपलाईन काढुन टाकुन नविन टाकण्यात येतील. विठाळा येथे १३ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे.पाण्याची टाकी ते जलशुध्दीकरण ही पाईपलाईन७०० मि. मी. ची असून ती ५०० ते ७०० मिटर राहील. पुसधरण ते जलशुध्दीकरण एवढी नविन ४०० मि. मी. ची पाईपलाईन यात टाकण्यात येईल. पुसधरणावरील आता कार्यरत १००-१००एचपी चे जे चे जे दोन मोटरपंप आहेत काढुन तेथे १५०-१५० एचपी चे तीन पंप टाकण्यात येतील आणि ते काढलेले पंप पुसद जलशुध्दीकरणामध्ये टाकण्यात येतील (त्यावेळी चांगल्या स्थितीतअसतील तर). जलशुध्दीकरण व पुसधरण येथे दोन्ही ठिकाणी अंदाजे ४०० कि. वॅटचे सोलार युनिट उभारण्यात येईल. आता शहरात १२ एमएलटी जलशुध्दीकरण येथे पाण्याची उपलब्धता आहे. त्यात आणखी १४ एमएलटी एवढे पाणी वाढेल. एकूण २६ एमएलटी पाणी उपलब्ध असेल. नविन पाईपलाईन टाकतांना बाजारपेठेत या पाईपलाईनचे फायर हॅन्ड्रेड (वॉल) टेक्नीकल पॉईंटला धरुन काढण्यात येतील. ज्याची मदत बाजारपेठेत एखादी आग लागल्यास ह्या वॉलचा पाणी घेण्याकरीता अग्निशामकला उपयोग होईल.याशिवाय इतर संभावित दुरुस्त्या करण्यात येतील.जेणेकरुन शहरात सर्व ग्राहकांना पाण्याचा योग्य दाब स्वच्छ पाणी मिळण्याचा प्रयत्न केला आहे.याशिवाय या योजनेत बऱ्याच सुधारणा आहेत.महत्वाचे घटक आपणासमोर मांडले आहे, अशी माहिती ॲड. उमाकांत पापीनवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.या पत्रकार परिषदेस दीपक काळे, संजय बयास, लक्ष्मणरावआगाशे, दीपक उखळकर, अशोक बाबर, अनिल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close