ईतर

शिव सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा उत्साहात संपन्न ११००० विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीचा शैक्षणिक उपक्रम 

पुसद :अखंड महाराष्ट्राची अस्मिता विश्वभूषण, कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या३९६ व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवराय जन्मोत्सव समिती पुसद यांच्यावतीने शैक्षणिक उपक्रमांतर्गत आयोजित , पुष्पावंती नागरी सहकारी पतसंस्था पुसद व विश्वनाथ सिंह बयास नागरी सहकारी पतसंस्था पुसद प्रायोजित दिनांक ७फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य शिव सामान्य ज्ञान परीक्षा संपन्न झाली. या परीक्षेत पुष्पावंती शहरातील विविध शाळांमधून 11000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग नोंदविला. श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुसद येथे स्पर्धा परीक्षा उद्घाटनीय समारंभ व मुख्य शिवपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद चे अध्यक्ष अनिरुद्ध विजयराव पाटील चोंढीकर ,छत्रपती शिवराय जन्मोत्सव समिती चे अध्यक्ष हरगोविंद कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून शिव सामान्य ज्ञान परीक्षेचे उद्घाटन केले.

याप्रसंगी शिवाजीराव कदम, दीपक देशमुख ,प्राचार्य रामचंद्र हिरवे ,प्राचार्य लक्ष्मण वानखेडे, उपप्राचार्य दत्तात्रय जीवने ,प्रवीण कदम यांची उपस्थिती होती सारंग कोरटकर व विद्यार्थी यांच्या सामूहिक जिजाऊ वंदने नंतर परीक्षेला सुरुवात झाली. वर्ग ८ ते १२ अ गट आणि वर्ग ४ ते ७ ब गट याप्रमाणे परीक्षेसाठी पुसद शहरातील २८ शाळांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला असून, कोषटवार दौलतखान विद्यालय येथे छत्रपती शिवराय शोभायात्रा समिती प्रमुख एडवोकेट भारत जाधव, हरगोविंद कदम ,चंद्रकांत ठेंगे यांच्या हस्ते शिवपूजन झाले. मातोश्री विद्यालय श्रीरामपूर येथे गटशिक्षणाधिकारी धीरज आडे समितीचे मार्गदर्शक दिगंबर जगताप, स्पर्धा परीक्षेचे समिती प्रमुख चंदू देशमुख, नितीन पवार यांच्या हस्ते शिवपूजन झाले.

त्याचबरोबर प्रत्येक शाळेने प्रारंभी आपल्या स्तरावर शिवपूजनाचा कार्यक्रम घेऊन परीक्षेला सुरुवात केली. शिव सामान्य ज्ञान परीक्षेमुळे छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत व घराघरापर्यंत पोहोचला असून त्यातून मिळणारी ऊर्जा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया अनेक विद्यार्थी व पालकांनी दिली. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गजानन जाधव यांनी केले. सदर परीक्षा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा परीक्षा समिती सदस्य,प्रमुख चंदू देशमुख , प्रभाकर टेटर यशवंतराव देशमुख ,शशिकांत जामगडे ,अनिल विरखडे , प्रा. गजानन जाधव, सुशांत महल्ले,अमोल शिंदे ,प्रतापराव पतंगे अडकिने यासह छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close