शेतकऱ्याचा सातबारा कोरा करूनच माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकसाहेबांच्या स्मृती दिनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहावे-मनीष जाधव शेतकरी नेते!
शेतकऱ्यांचा ७/१२ 'कोरा' केला तरच खऱ्या अर्थाने हि नाईक साहेबांना श्रद्धांजली ठरेल!

पुसद : शेतकऱ्यांच आराध्य दैवत हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांच्या ४६ व्या स्मृतिदिनानिमित्त राज्यातील कृषी क्षेत्रात प्रगतशील शेतकऱ्यांना पुरस्कार वितरण सोहळा वसंतराव नाईक प्रतिष्ठानच्या वतीने १८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे उपस्थित राहणार असून यांच्या हस्ते प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
खरे तर निवडणुकीच्या काळात महायुतीकडून कर्जमाफीचा जोरदार प्रचार करण्यात आला होता. त्यामुळे सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्याच बैठकीत कर्जमाफी जाहीर होईल, अशी हवा निर्माण केली होती. निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक यश मिळाले. व मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. पण त्यांनी अजून कर्जमाफीविषयी शब्दही काढला नाही. कर्जमाफी संदर्भात राज्यात अनेक आंदोलन झाले पण महायुती सरकारने कोणती दखल घेतली नाही त्यामुळे आता मुख्यमंत्री शेतकरी आत्महत्याग्रस्त प्रणव जिल्ह्यातील पुसद तालुक्यात वसंतराव नाईक साहेबांच्या जन्मभूमीत उपस्थित राहणार असल्याने शेतकऱ्याचा सातबारा कोरा करूनच महानायकाला श्रद्धांजली अर्पण करावी. यापूर्वीस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू भाऊ शेट्टी यांनी वसंतराव नाईक साहेबांच्या जयंतीदिनी निमित्त १ जुलै २०२४ ला गहुली या गावी समाधी स्थळाला नतमस्तक होऊन आदरांजली दिली होती त्यावेळी त्यांनी प्रामुख्याने दोन विधायक मागण्या राज्य व केंद्र शासनाकडे केल्या होत्या सततची नापिकी , शेतमालाला नसलेले हमीभाव , नैसर्गिक आपत्ती , वाढलेलं वैश्विक तापमान , उत्पादनावरील वाढलेलं खर्च , वन्य जीवाचा त्रास, केंद्र शासनाच्या वाणिज्य मंत्रालयाच्या आयात निर्यातीचा कृषी क्षेत्रावर थेट आर्थिक परिणाम , या कारणाने शेतकऱ्यांच्या सातबारा वरील झालेला कर्जाचा बोजा हा शासन धोरणाचे पाप असून त्यामुळे, माती आणि मातीतल्या माणसाला जपणाऱ्या भूमिपुत्र महानायक वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्त योजना आणून शेतकऱ्यांचा , ७ /१२ कोरा करून कर्जमुक्त करण्यात यावे व थकलेलं शेतीपंपाचं वीज बिल माफ करावं या शेतकरी हिताच्या मागण्या केल्या होत्या. परंतु महायुतीचे शासन सत्तेत आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात ७ जुलै २०२४ ला शेतकऱ्यांचे काही अटी शर्ती घालून विद्युत पंपाचं विज बिल माफ केलं व आता वसंतराव नाईक साहेबांच्या नावाने शेतकरी कर्जमुक्त योजनेची घोषणा करण्याची मागणी करण्यात येत असून ही महानायक वसंतराव नाईक साहेबांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकरी नेते मनीष जाधव यांनी भावनिक आवाहन केले आहे.



