शेंबाळपिपरी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा लोकप्रतिनिधीना विसर काही पुढाऱ्यांची राजकीय भेट! तर शरद मैन्द यांनी अर्थीक मदत करुन दिली संजीवनी!
शेतकऱ्याच्या आठ एकरातील हरभऱ्याच्या गंजीला अज्ञाताने लावली आग शेतकऱ्याचे चार लाखांचे नुकसान!

पुसद: तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथील शेतकरी हनुमान मोरे यांनी जगापुर शेत शिवारातील शेतामध्ये आठ एकर हरभरा पेरणी केली होती. हरबरा पिक काढणी करुन गंजी रचुन ठेवली हाेती़ अज्ञात व्यक्तीने ही गंजी पेटवून दिल्याने त्यांचे चार लाख रूपयांचे नुकसान झाले़ ही घटना ९ मार्च राेजी उघडकीस आली़ या प्रकरणी अज्ञात आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी काही राजकीय पुढार्याने राजकीय भेटी दिल्या तर लोकप्रतिनिधींना मात्र याचा विसर पडला होता परंतु पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या पिकाची पाहणी करून तात्काळ आर्थिक मदत करुन त्या शेतकऱ्याला संजीवनी दिली.
याबाबत प्राप्त माहिती अशी की,पुसद तालुक्यातील शेंबाळपिपरी येथील हनुमान रामकिसन मोरे या शेतकऱ्यांच्या जगापुर शेत शिवारातील आठ एकर वरील हरभरा पिकांच्या गंजीला अज्ञाताने आग लावली ही आग इतकी भिषण होते की या आगित शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे शेतातील हरभरा पिकाची अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने चार लाख रुपयांचे नुकसान झाले़ ही घटना ९ मार्च राेजी उघडकीस आली़ या प्रकरणी अज्ञात आराेपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला होते मात्र या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा विसर पडल्याचे चित्र आहे तर काही पुढाऱ्यांनी स्वतःचा गवगवा करण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्याची राजकीय भेट घेतली होती पण मोठ्या कष्टाने पिकविलेल्या पिकांची राख झाली तरीही शासन प्रशासनाकडून मदतनिधीची आवश्यकता असताना मात्र संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचे चित्र आहे पण अर्बन बँकेचे कुशल अध्यक्ष शरद भाऊ मैन्द यांनी भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत समितीचे अध्यक्ष यांना नात्याने २५०००/-हजार रुपयाचा धनादेश हनुमान रामकिसन मोरे या नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात देऊन नवी संजीवनी दिली तसेच सोबतच गावाकऱ्यांना आवाहन केले की,आपण सुद्धा या पीडित कुटुंबाला मदत करावी परंतु काही राजकीय पुढार्यांनी राजकीय भेटी देऊन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले आहे किंवा आपणच या शेतकऱ्याचे वाली आहोत असा गवगवा केला आहे. तर मतदार संघातील लोकप्रतिनिधींना या नुकसान ग्रस्त शेतकऱ्याचा विसर पडला आहे तर पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैन्द यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत केल्याने या कुटुंबाने शरद मैंदं यांचे आभार मानले आहे.यावेळी शेंबाळपिपरीचे सरपंच रवींद्र महल्ले, भोरे साहेब मंडळ अधिकारी आडे,तलाठी शेबाळपिंपरी शेख साहेब तलाठी जगापूर, नंदू बंग,जय बंग,संतोष काळे, संतोष मोरे, संदीप मदने,नागेंद्र मेटकर, गुणवंत सोळंखे,उत्तम बैस, ओम बैस,रमेश सोळंखे,संतोष काळे, भिकू बैस, संभाजी माने, डॉ. अजित चंदेल,राधेश्याम देशमुख, मंगेश चंदेल, सतीश भोरे,गुलाब कापसे, गुलाब सुरोशे,पवन मोरे,अविनाश मोरे,अंबादास मोरे, पंडितराव देशमुख यशवंतराव चौधरी, विजय चव्हाण, विनोद सोनी, इम्रान पठाण, मतीन पहेलवान,डॉ शिरसाठ, शेख हकीम,हे या प्रसंगी उपस्थित होते.