पुसद पंचायत समिती कार्यालयापुढे माणिकडोह येथील ग्रामस्थांचे विविध मागण्यासाठी अर्धनग्न उपोषण!

पुसद :शहरापासून जवळच असलेल्या माणिकडोह ग्रामपंचायतीचे ग्रामस्थ विविध मागण्यासाठी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर अर्धनग्न उपोषण करीत आहे.विविध समस्यासह योजनेतील कामाच्या तक्रारी करून सुद्धा कुठलीही दखल न घेतल्यामुळे दि.२० फेब्रुवारी २०२६ पासून पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे तरीही संबंधित निगरगट्ट प्रशासनाला जाग येत नाही.
माणीकडोह येथील उपोषणास बसलेले भाऊराव बेले,पांडुरंग माहुरे,सुरज मोहेकर,माधव बुरकुलेसह ग्रामस्थ अर्धनग्न उपोषणास बसल्याने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.माणिकडोह ग्रामपंचायतीने सन २०२३ ते २०२५ मध्ये सामान्य व पाणीपुरवठा फंड मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करणे, घरकुल विषयी शबरी व पंतप्रधान आवास योजना,रमाई आवास योजनेचे जे लाभार्थ्यांनी कार्यालयास लाभार्थ्यांनी जे फाईल सादर केली आहेत.त्या संदर्भात सन २०२१ ते २०२५ मध्ये प्रस्ताव सादर केलेल्या टॅक्स पावतीच्या सत्यप्रती व नमुना ९ ला खतावणी केल्याची सत्यप्रती मागितल्या होत्या. जिल्हा परिषद शाळेत मुलींसाठी शौचालय बांधकामासाठी शौच खड्ड्याचे बांधकाम केले नाही. कार्यालयास दि.२९ जानेवारी २०२६ ला घनकचरा व्यवस्थापनाचे विकृत दर्जाचे काम झाल्यामुळे पत्र दिले होते. पंतप्रधान आवास योजनेच्या सर्वेमध्ये जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याचे तक्रार नमूद आहे.संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली होती.सन २०२१ ते २०२५ चा निधी वाटप न केल्यामुळे व त्यामध्ये भ्रष्टाचार केल्यामुळे सरपंच सचिवावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दि.२९ जानेवारी २०२६ रोजी पत्र दिले होते.परंतु १५ दिवस उलटूनही त्या तक्रारीची कुठलेही प्रकारची दखल घेतली नाही.परिणामी गटविकास अधिकाऱ्याला उपोषणाला नागडे बसत असल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी काय भूमिका घेणार याकडे उपोषण करते कर्त्याचे लक्ष लागले आहे.मात्र सरपंच बाईच्या पतीच्या मतें हे उपोषण पोटभरे उपोषण असण्याचा आरोप केला असुन उपोषणकर्ते जाणीवपूर्वक बिनबुडाचे आरोप करत असुन त्यांनी यापूर्वी सुद्धा अनेक तक्रारी दाखल केल्होया होत्या.त्या तक्रारीच्या आधार घेत पैशाची मागणी केली होती.ते वारंवार पैशाची मागणी करत आहेत.पैसे न दिल्यामुळे त्यांनी उपोषण सुरू केले आहे.उपोषणकर्ते हे खंडणी बहाद्दर असून त्यांनी पोटभरे उपोषण सुरू केले असल्याचा खळबळजनक आरोप सुखदेव आसोले,सरपंचबाईचे पती,माणिकडोह त्यामुळे या तक्रारीची संबंधित प्रशासनाने सखोल चौकशी करावी तेंव्हाच सत्य बाहेर येईल. त्यामुळे या उपोषणाकडे सर्वसामान्य लक्ष लागले आहे.त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. उपोषणकर्त्यांनी या अगोदर तक्रार केली होती.त्या तक्रारीच्या आधार घेत पैशाची मागणी केली होती.ते वारंवार पैशाची मागणी करत आहेत.पैसे न दिल्यामुळे त्यांनी उपोषण सुरू केले आहे.उपोषणकर्ते हे खंडणी बहाद्दर असून त्यांनी पोटभरे उपोषण सुरू केले आहे.सुखदेव आसोले,सरपंच,माणिकडोह



