क्राइमराज्यसामाजिक

हडसनी येथे अवैद्य देशी ,गावठी दारू विक्री मटका जोरात !

माहूर/प्रतिनिधी (संदीप कदम):- माहूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हडसनी नवी व जुनी येथे अवैध देशी, गावठी दारू विक्री व मटक्याने उच्चाद घातला असून खुलेआम जागोजागी मटका घेणे सुरू असून गावामध्ये मटका शौकीन मटका लावताना दिसत आहेत. सर्वसामान्य नागरिकांसह महिला शाळकरी मुलांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मागील अनेक दिवसापासून होत असलेली अवैद्य दारू विक्री यामुळे अनेकांची सुखी संसार भांडण तंट्यामुळे उध्वस्त होत आहे. यामुळे माहूर तालुक्यातील सामाजिक धार्मिक क्षेत्रात अग्रगण्य असलेले हडसनी गावाची शांतता भंग होत असून लहान मुलासह महिला सुद्धा मटक्याचे आहारी जात आहे. सध्या मोलमजुरी मिळत असल्याने शौकिकांना मटक्याचा शोक लागला आहे. बाहेर गावावरून अवैध देशी दारू आणून विक्री करणाऱ्यावर माहूर पोलिसांची मेहरबानी का ? संबंधित बीट जमादाराने झोपेची सोंग का घेतले..? हा प्रश्न येथील गावकऱ्यांना पडला आहे. लगेच यावर माहूर पोलिसांनी पायबंध घालण्याची मागणी हडसनी नवी व जुनी येथील गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close