ईतर

मागील पाच महिन्यापासून अपूर्ण असलेल्या रस्त्याचे काम ऐन सणासुदीच्या तोंडावर सुरू नागरिकांना व व्यापाऱ्यांना नाहक त्रास! 

पुसद : नगर परिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते नेताजी सुभाष चंद्र बोस चौकापर्यंत गेल्या पाच ते सहा महिन्यापासून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अत्यंत गरजेचे होते परंतु संबंधित विभागाने या रस्त्याच्या विकास कामाकडे साप दुर्लक्ष केल्याने तसेच कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे या रस्त्याचे काम धिम्यागतीने सुरुवात केली असून निधी मंजूर असतानाही काम होत नसल्याने ‘आंधळ दळतंय नि कुत्रं पीठ खांतय’ अशी अवस्था या रस्त्याबाबत झाली असून ऐन सणासुदीच्या दिवसात नागरिकांना व शहरातील व्यापाऱ्यांना या रस्त्याच्या कामामुळे नाहक त्रास सोसावा लागत आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, पुसद नगर परिषद क्षेत्रांतील शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते नेताजी सुभाष चंद्र बोस चौकापर्यंत मुख्य रस्त्याचे काम गेल्या सहा महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली. त्यावेळी सुद्धा पेरणी पाण्याचे दिवस असतांना हे काम सुरू केल्याने शहरातील व्यापाऱ्यांना व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला मात्र या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अत्यंत गरजेचे होते परंतु संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे या रस्त्याच्या विकास कामाकडे साप दुर्लक्ष केल्याने तसेच कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे या रस्त्याचे काम धिम्यागतीने सुरुवात केली असून निधी मंजूर असतानाही काम होत नसल्याने ‘आंधळ दळतंय नि कुत्रं पीठ खांतय’ अशी अवस्था या रस्त्याबाबत झाली असून सध्या शहरात दीपावलीची धामधूम सुरू आहे तर एकीकडे खरीप पेरणीचे दिवस असून हा रस्ता शहरातील मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यांवर नेहमी रहदारी असते या रस्त्यावर अनेक कृषी केंद्र , दवाखाने हार्डवेअर , बँका, ग्रेन मार्केट कापड दुकाने अदि दुकाने, असल्याने शेतकऱ्याची व नागरिकाची  मोठी गर्दी पाहावयास मिळते तर संबंधित कंत्राटकदाराने ऐन सणासुदीच्या दिवसात पुन्हा या रस्त्याच्या कामास सुरुवात केल्याने रस्त्यावर मोठ-मोठे दगडाचे ढीग डंपर मधून आणुन व्यापाऱ्याच्या दालना समोर  टाकले आहे. दगडाचे ढीग रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे या रस्त्यातून मार्ग काढताना दुचाकी आणि चारचाकी स्वरांना तारेवरची कसत करावी लागत आहे त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकडे नगरपरिषदेने वेळेत लक्ष देणे गरजेचे असून संभाव्य अपघात झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला यापूर्वी सुद्धा या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात पुन्हा रस्त्याचे काम सुरू केल्याने नागरिकांना व शहरातील व्यापाऱ्यांना या रस्त्याच्या कामामुळे नाहक त्रास सोसावा लागत आहे.निधी मंजूर असतानाही काम होत नसल्याने ‘आंधळं दळतंय नि कुत्र पीठ खातंय’ अशी अवस्था या रस्त्याबाबत झाली आहे. ” या निधी अंतर्गत रस्त्याची भक्कम बांधण व उत्कृष्ट दर्जाचे काम होणार आहे यात शंका नाही. मात्र, सदर काम पावसाळय़ापूर्वी पूर्ण होणे अत्यंत गरजेचे होते. पण या रस्त्याच्या विकासाकडे साफ दुर्लक्ष केल्याने पावसाळय़ापूर्वीअपेक्षित खडीकरण व अंतिम टप्प्यातील काम पूर्ण झाले नाही. या कामात हलगर्जीपणा झाल्याने त्याचा त्रास या भागातील नागरिकांना व व्यापाऱ्यांना सोसावा लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close