शालेय जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत जि.प.उच्च प्रा.मराठी शाळा वालतुर तांबडे संघ विजयी!

पुसद: तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा वालतुर तांबडे नुकत्याच यवतमाळ येथे दि९ ऑक्टोंबर ते १०ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या शाले जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेतील सामन्यात अंडर १४ मुले वयोगटात भाग घेतला होता.जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत अंतिम फेरी जिंकून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा वालतुर तांबडे च्या विद्यार्थाचे दोन्ही संघ विजयी झाले.
यावेळी विजयी संघाला सन्मानित करण्यात आले. या कामगिरीमुळे या दोन्ही संघाची विभागीय स्तरावर निवड झाली आहे. हे दोन्ही संघ बुलढाणा येथे होणाऱ्या शालेय विभागीय खो-खो स्पर्धेसाठी पात्र झाले आहे त्यामुळे या दोन्ही गटातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीप कामगिरी केल्यामुळे ते सर्वांच्या कौतुकाचा विषय बनला आहेत. मुख्याध्यापक मधुकर मोरझडे, प्रल्हाद जाधव,भारत राठोड, जयसिंग चव्हाण, प्रफुल्ल पांडे, विकास वाकडे, रोहिदास पवार, श्रीराम आढाव, संभाजी हंगरगे, विक्रम राठोड,अभिजीत नवलकार, ग्रामसेवक साखरे साहेब, आलसिंग राठोड, संतोष तांबारे, सदानंद राठोड, दिलीप जाधव,उल्हास राठोड,परमानंद राठोड, केवल भिसे,गजानन हमाने, प्रकाश चिरंगे,निलेश राठोड, राहुल जाधव व सर्व ग्रामस्थ पदाधिकारी व पालक यांनी या विद्यार्थ्याचे कौतुक केले आहे तसेच अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.