खंडाळा घाटातील धक्कादायक घटना! एकाचा निर्घृण खून;पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जंगलात दगडाखाली पुरला! अवघ्या चार तासात खून प्रकरणाचा उलगडा; स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई!

पुसद : ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खंडाळा घाटातील जंगलात खंडाळा पोलीस स्टेशन येथे बेपत्ता असलेला २१ वर्षीय तरुणांच्या गळ्यावर अज्ञाताने धारदार शस्त्राने वार करून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह खंडाळा घाटातील जंगलातील दगडाखाली पुरून ठेवला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने या खुनाच्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान होते पोलिसांनी तपासाची चक्र फिरविताच अवघ्या चार तासात या खुन प्रकरणांचा उलगडा झाला असून तीन आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी झेप न्यूजला दिलेली माहिती अशी की,दि.८जुलै२०२५ रोजी १६/०० वाजता पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळा घाटात पोलीस स्टेशन खंडाळा येथे मानव मिसींग रजि नं २२/२०२५ मधील मिसींग (बेपत्ता) इसम नामे-शेख अयाज शेख हारुन वय २१ वर्ष, रा. खंडाळा ता. पुसद यांचा कोणीतरी अज्ञात इसमांने गळयावर धारदार शस्त्राने वार करुन त्यास जिवेठार मारुन पुरावा नष्ठ करण्याच्या उद्देशाने खंडाळा घाटात जंगलात त्याच्या प्रेतावर दगड गोटे टाकून लपवून ठेवले होते. अशा परिस्थितीत मृतदेह आढळून आल्याने त्यावरुन इसम नामे-शेख हारुन शेख हुसेन वय ५० वर्ष, रा. खंडाळा ता.पुसद जि. यवतमाळ यांनी दिलेल्या तक्रारी वरुन दि,८ जुलै २०२५ रोजी पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे अप क्रमांक ४३२/२०२५ कलम१०३, ३(५) २३८ भान्यास अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हाचे गांभीर्य पाहून व सदर गुन्ह्यातील अज्ञात मारेकरी शोधण्याचे पोलीसांपुढे मोठे अवाहन पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे पोलीस निरीक्षक सतीष चवरे यांना गुन्हांतील अज्ञात आरोपीचा शोध घेणे कामी आदेशीत केले होते. त्याप्रमाणे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद या पथकांस सदरच्या गुन्हांतील अज्ञात आरोपीचा शोध घेवून त्यांना तात्काळ अटक करुन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद पथकांने तात्काळ सदर गुन्ह्यांच्या घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाचे निरीक्षण करुन सदर गुन्हांचा समांतर तपास सुरु केला त्याप्रमाणे त्यांना गुप्त बातमीदारा कडून काही संशयीत लोकांची माहीती प्राप्त झाली असता त्यावर सदर पथकांने अभ्यास करुन पोलीस कौशल्याचा वापर करुन सदर गुन्हांतील आरोपी हे मयतांचे शेताच्या शेजारील व ओळखीचे असल्याचा अंदाज लावून त्याप्रमाणे संशयीत इसम नामे- १) शेख अल्ताफ शेख इरफान ऊर्फ अप्पू वय ३५ वर्ष, २) शेख वसिम शेख इरफान ऊर्फ अप्पू वय २४ वर्ष, ३) शेख अफताफ शेख अल्ताफ वय १९वर्ष, सर्व रा. खंडाळा ता.पुसद जि. यवतमाळ यांना ताब्यात घेण्यासाठी गेले असता सदर आरोपी हे खंडाळा जंगलात लपून बसण्याच्या इराद्याने असतांना त्याना अतिशय मोठ्या शिताफीने ताब्यात घेवून पोलीस कौशल्याचा वापर करुन त्यांच्याकडे विचारपूस करता यांतील मयत इसम व आरोपी यांच्यात पुर्वी भांडण झाले होते. व गेले दोन दिवसापुर्वी मयत हा त्याचे बक-या व बैल आरोपी यांचे शेताजवळ चारण्याकरीता घेवून आला असता त्या कारणावरुन या आरोपीनी संगणमत करुन मयतांस मारहाण करुन कु-हाडीने त्याच्या गळयावर वार करुन पुरावा नष्ठ करण्याच्या उद्देशाने सदरचे प्रेत जंगलातील दगडाखाली गोटे टाकून लपून ठेवले अशी कबूली दिल्याने सदरचा गुन्हां उघडकीस आला. त्यांना पुढील कारवाई करीता पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण यांच्या ताब्यात दिले.सदरची कारवाई मा. जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच मा. सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी.जे सा, मा. पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. धिरज बांडे, पोउपनि/शरद लोहकरे, पोहवा/मुन्ना आडे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, पोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.