अनुसूचित जमातीच्या रखडलेल्या पदभरतीच्या जागा शासनाने तात्काळ भरण्याची मागणी; पुसद येथे आदिवासीं कृती समितीच्या वतीने रास्ता रोको!
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी शासनाने तात्काळ ठोस धोरण जाहीर करावे!

पुसद: राज्यातील अनुसूचित जमातीची रिक्त व अधिसंख्या पदभरती रखडलेली पद भरती रिक्त व अधि संख्या पद भरती प्रक्रियाअनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची रखडलेल्या पदभरतीसाठी आदिवासी कृती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तसेच हींगोली येथे सुरू असलेल्या उपोषणास पाठिंबा दर्शविण्यात आला यानंतर विविध मागण्यांचे निवेदन आदिवासी कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसील प्रशासना मार्फत निवेदन पाठविण्यात आले.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची विशेष पदभरती अधिसंख्य १२५२० रखडलेली पदभरती व अनुसूचित जमातीचे रखडलेले ८५००० तात्काळ भरण्याच्या मागणी करण्यात आली असून या वेळी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असून सुद्धा आदिवासी विशेष पदभरती झाली नाही त्यामुळे १२५२० पदे तात्काळ भरण्यात यावे. शासकीय व निम्म शासकीय पदभरती मध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात यावे, शासन निर्णय २०१९ नुसार अनुसूचित जमाती जात पडताळणी कार्यालय समितीकडे प्रलंबित असलेल्या सशर्त वैद्यता प्रकरणाची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी, अनुसूचित जमाती प्रवर्गातील ८५००० रिक्त पदांची पदभरती तात्काळ सुरू करण्यात यावी. आदिवासी विद्यार्थ्यांचे सार्वजनिक आरोग्य विभागातील १५४१ गट अ.ब.क.ड च्या संवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावे यासह आदी मागण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलनाचे आयोजन आदिवासी कृती समिती पुसदच्या वतीने करण्यात आले या आंदोलनाच्या निमित्ताने हिंगोली येथे सुरू असलेल्या विशेष पदभरतीसाठीच्या उपोषणाला पाठिंबा देण्यात आला असून यावेळी अध्यक्ष: देविदास डाखोरे उपाध्यक्ष: पांडुरंग व्यवहारे, संतोष गारोळे, प्रकाश मोरे सचिव: संदीप आढाव सहसचिव: अतीश वाघमारे सल्लागार: अँड. रामदास भडंगे, सुरेश धनवे, गणपत गव्हाळे सदस्य: गजानन टारफे, लक्ष्मण टारफे, गजानन उघडे, रंगराव काळे, सुदाम चिरंगे, गजानन फोपसे, ज्ञानेश्वर मेटकर, राजू गायकवाड, गणेश भुजाडे, किसनराव काळे, किसन भुरके, रजनीकांत सरकुंडे, रंगराव व्यवहारे, सुरेश बोके, राजेश घुक्से, पंकज वंजारे, तालुक्यातील प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते माधवराव वैद्य रामकृष्ण चौधरी देवेंद्र खडसे बौदरत्न भालेराव नाना बेले शरद ढेंबरे तातेराव भडंगे नारायण कऱ्हाळे मारोती भस्मे अर्जुन हगवणे अमोल पाचपुते सुरेश सिडाम गजानन उघडे गजानन फोपसे सुनील ढाले गजानन चिरंगे वसंता चिरमाडे इरपाते साहेब भूषण अंभोरे स्वप्नील इंगळे संजय गोदामले अशोक तडसे सचिन आत्राम सौ.सुनीता मळघणे सौ वर्षाताई वैद्य किसन काळे पांडुरंग मळघणे प्रदीप घावस अजय ढंगारे किसन मळघणे अमोल सरकुंडे आकाश काळे रामदास बुरकुले यांच्यासह आदिवासी समाजातील विद्यार्थी युवक महिला पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी संबंधित प्रशासनाने आंदोलकाच्या मागण्या मान्य न केल्यास महाराष्ट्रभर सविनय कायदेभंग करण्यात येईल असा या कृती समिती ने शासनास आणि प्रशासनास इशारा दिला.
शांततामय आणि संवैधानिक मार्गाने झालेल्या या आंदोलनाने संपूर्ण पुसद तालुक्यातून प्रशासनाचे लक्ष वेधले असून, लवकरच शासन सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा आदिवासी कृती समितीने व्यक्त केली आहे.या आंदोलनाच्या वेळी पोलीस प्रशासनाने शांतता राखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली असून आंदोलकांनी प्रशासनाला सहकार्य केले आहे.