Uncategorizedराजकिय

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी निवडून द्या : संजय देशमुख

पुसद : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान दि. २६ एप्रिल रोजी होऊ घातले आहे यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या वतीने मी अधिकृत उमेदवार म्हणुन उभा आहे. मागील २५वर्षात या मतदार संघाचा विकास झाला नाही.यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी मशाल या चिन्हासमोरील बटण दाबुन प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन महाविकासआघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी जांबबाजार येथे झालेल्या जाहीर सभेत केले.

याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मोहम्मद नदीम, युवा नेते ययाती नाईक, राकाँ लिगल सेलचे प्रदेशाध्यक्ष ॲड. आशिष देशमुख,शिवसेना नेते राजुसिंग नाईक, माजी आ.ख्वाजा बेग, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रविणशिंदे, राजु दुधे, जिया शेख, माधवराव वैद्य,रंगराव काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी मतदारांना आवाहन केले की,गेल्या २५ वर्षात भावना गवळी ह्या खासदार होत्या. परंतु त्यांनी संसदेत आवाज उठविल्याचे ऐकीवात नाही. परंतु मी तुम्हाला खात्री देतो की आपल्या आशा-अपेक्षा भंग होऊ देणार नाही. त्यासाठी एकवेळ मला संधी द्या असे संजय देशमुख म्हणाले. मोदी सरकारवर टिका करतांना ते म्हणाले,शेतकऱ्यांचा शेतमाल मार्केटमध्ये आल्यानंतर – कापूस व सोयाबीन आयात केल्या जाते. – त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. खते व बियाण्यांचे भरमसाठ भाव वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पुसद तालुक्यातील विशेषतः माळपठारावरील पाण्याचा प्रश्न निश्चितपणे  सोडविल्या जाईल अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.

डॉ. मोहम्मद नदीम काँग्रेस नेते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाची गरिमा संपविली आहे. मागील दहा वर्षात अनेक आश्वासने दिलीत. परंतु एकाही आश्वासनाची त्यांनी पुर्तता केली नाही. भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेणे हीच आता मोदीची – गॅरंटी झाली आहे. देशाचा सर्वांगिण विकास हा काँग्रेस राजवटीतच झाला आहे. पुन्हा एकदा महाविकास आघाडीची सत्ता – आणण्यासाठी उमेदवार संजय देशमुख यांना  प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन डॉ. मोहम्मद नदीम यांनी केले. प्रत्येक मालावर जीएसटी लावुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाई वाढवुन दिली. शेतकऱ्यांचा सन्मान म्हणुन ६ हजार वर्षाला देवुन त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. एकप्रकारे शेतकऱ्यांची अवहेलना केली आहे. संविधानामधील अधिकार अबाधित ठेवण्यासाठी व आपल्या हक्कासाठी संजय देशमुख यांच्या नावासमोरील मशाल या चिन्हासमोरील बटण दाबुन त्यांना प्रचंड मतांनी निवडुन द्यावे असे आवाहन त्यांनी केलैआहे.

माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ययाती मनोहरराव नाईक

मागील चार वर्षात भाजपाने इतर पक्षातील लोकांना पक्षात घेवून राज्य करीत आहेत. भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेवून त्यांना जीवदान देत आहे. अशा भ्रष्ट सरकारला उलथवुन टाकण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते ययाती नाईक यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, वसंतराव नाईक यांचा खरा वारसदार असुन शरदचंद्र पवार यांच्या सोबत सुधाकरराव नाईक हेही होते. आजही मी जिथे आहे तिथेच आहे. पक्ष सोडून जाणाऱ्याला मी यापुढे बोलणार नाही. ईमानदारीने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करेन आणि सुधाकरराव नाईकांचा वारसा पुढे चालविणार असल्याचे ते म्हणाले. संजय देशमुख य मी विकास पाहतो. दोन वेळा आमदार आणि काही वर्षे मंत्री राहिलेले संजय देशमुख यांच्यामध्ये प्रशासनाचा अनुभव आहे. निश्चितपणे ते आपल्या समस्या सोडवतील. यासाठी त्यांना निवडून आणणे गरजेचे आहे असे ययाती नाईक यांनी आवाहन केले.

 

ॲड. आशिष पंजाबराव देशमुख..

पंतप्रधान नरेंद्र मोदी अब की बार ४०० पार चा नारा देतात. एवढी खात्री होती तर राज्यामध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फोडून सत्ता का स्थापन केली.? असा प्रश्न उपस्थित करुन येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन ॲड. आशिष देशमुख यांनी केले.मुख्य निवडणूक आयोगाची नेमणूक राष्ट्रपतींना आहे. परंतु पंतप्रधानांनी स्वतःकडे अधिकार घेवून आपल्या मर्जीने निवडणूक आयुक्ताची नेमणूक केली आहे. संविधान वाचविण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन ॲड. आशिष देशमुख यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close