गांजा अंमली पदार्थ विक्री करणा-या दोन इसमांवर स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची NDPS कायद्या अंतर्गत कारवाई;एकूण, 78,300/- रु मुददेमाल जप्त
पुसद शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना!

पुसद:यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भा.पो. से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.दि. 28जानेवारी2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद हे उमरखेड व पुसद उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना सायंकाळी 16/45 वाजता सुमारांस गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, एक इसम बजाज कंपनीची प्लॅटीना मोटार सायकल क्रमांक MH-22 AG 0042 वर गांजा अंमली पदार्थ घेवून छत्रपती शिवाजी महाराज चौक पुसद कडून शेंबाळपिंपरी बाजूकडे घेवून येणार आहे. अशी माहीती मिळाल्याने संदर्भात प्राप्त माहिती वरुन पथकाने तात्काळ वरिष्ठांना याबाबत अवगत करुन मौजे बोरी मुखरे गावच्या हददीत पुसद ते शेंबाळपिंपरी रोडवर रात्री 18/40 वाजण्याचे सुमारांस सापळा लावला असता पुसद बाजूकडून एक मोटार सायकल त्यावर एक इसम येत असतांना दिसून आल्याने पोलीस कौशल्याचा वापर करुन अतिशय शिताफिने सदर मोटार सायकल रोडच्या बाजूला थांबवून पाहणी केली असता मिळालेल्या गोपनिय माहीती मधील बजाज कंपनीची प्लॅटीना मोटार सायकल क्रमांक MH-22 AG 0042 मिळून आल्यान े सदर इसमांस ताब्यात घेवून त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव 1) सुनिल प्रेमचंद जोशी वय 48 वर्ष रा. विठठल मंदीर जवळ वार्ड क्रमांक 02 शेंबाळपिंपरी ता. पुसद जि. यवतमाळ असे असल्याचे सांगितल्याने त्यांच्याकडील एका केसरी रंगाच्या प्लॉस्टीक पिशवीची पाहणी केली असता 1 किलो 665 ग्रॅम गांजा अंमली पदार्थ मिळून आल्याने ते जप्त करुन त्यांचेकडील, एक मोबाईल, बजाज कंपनीची प्लॅटीना मोटार सायकल क्रमांक MH-22 AG 0042 असा एकूण किंमत 78,300/- रु चा मुददेमाल जप्तीसह दोन इसमा विरुध्द अंमली औषधी व मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1895 चे कलम 8 (c), 20 (b), (B)अन्वये पोलीस स्टेशन पुसद शहर येथे गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ही अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या, गुन्हे उघड करणे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी चे उच्चटन करण्यास प्रतिबध्द असून यापुढे यासंबंधी जनतेला कोणतेही माहिती असल्यास सदरची माहिती पोलीसांना निःसंकोच देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता (भा.पो. से) सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात (म.पो. से) सा तसेच मा. सहा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी जे सा, (भा.पो. से) सा मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि धिरज बांडे, सपोनि पवन राठोड, पोउपनि शरद लोहकरे, सफो मुन्ना आडे, पोहवा संतोष भोरगे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोह बबलु चव्हाण, पोह मिथून जाधव, पोह सोहेल मिर्झा, पोना किशोर झेंडेकर, पोशि अमित झेंडेकर, चापोउपनि रविंद्र शिरामे, चापोशि राजेश जाधव, चापोशि अमित कुमरे, सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे



