‘लुटेरी दुल्हन’ पळाली : मराठवाड्यातील नवरी ने पुसदच्या नवरदेवासोबत ‘मॅरेज ट्रॅप’, आधी हळद लावली, नंतर २लाख४० हजाराचा ‘चुना’ लावला!

पुसद : सध्या राज्यात तरुणांचे अविवाहित राहण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. नोकरीच्या संधींचा अभाव, शहराकडे झुकलेली मानसिकता आणि समाजाची नकारात्मक दृष्टी यामुळे या तरुणांना लग्नासाठी जोडीदार मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे जोडीदाराच्या शोधात असलेले अनेक इच्छुक तरुण अविवाहित आहेत त्यामुळे ‘विवाह जुळवून देणाऱ्यांच्या सध्या असे इच्छुक तरुण रडारवर आले असून, विवाह जुळून देणारे ‘लग्नाची गोड स्वप्ने’ दाखवत अशा तरुणांची लाखोंची आर्थिक फसवणूक करीत असल्याचे प्रकार राज्यभरात वाढू लागले आहेत. सर्व प्रयत्न करूनही लग्न जुळत नसल्याने अनेकजण ऑनलाइन मॅट्रिमोनियल वेबसाईट्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व विवाह संकेतस्थळांचा आधार किंवा विवाह जुळून देणाऱ्या ओळखीच्या तसेच अनोळखी व्यक्तींच्या जाळ्यात अडकत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येऊ लागले आहे. असाच एक ‘मॅरेज ट्रॅप’ चा प्रकार आपल्या शहरात घडल्याचे उघड झाले आहे. देवदेव होताच नवरी पसार झाली असून नवरदेवाची २ लाख ४० हजारांने फसवणूक करणाऱ्या व विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली वर मुलाला गंडा घालणाऱ्या वधूसह तिन जणांना विरुद्ध पुसद शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे तर याप्रकरणी. शहर पोलिसांनी विवाहाच्या नावाखाली वराला गंडा घालणाऱ्या वधूसह आणखी तिघांवर १८ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातील फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
सुनेंना हिम्मत कुरील (वय २० वर्ष मुलगी) तिची आई ज्योती हेमंत कुरील (वय ४० वर्षे) सयाबाई शिंदे ( वय ६० वर्षे)रा.साई कॉर्नर मराठवाडा ता.जि.परभणी व दीपक सटवाजी ठमके (वय ५५ वर्षे) रा.कासोळा ता.महागाव जि. यवतमाळ, अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत ‘झेप न्यूज’ ला सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सध्या अविवाहित तरुणांना लग्नाचे आम्हीच दाखवून विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली ‘मॅरेज ट्रॅप’ सारख्या अनेक घटना घडत आहे.प्रत्येक समाजामध्ये मुलीचे प्रमाण कमी असल्यामुळे पुसद शहरातील एका व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या शुभमचे अनोळखी मुली सोबत लग्न जमविण्यात आले. लग्नही पार पडले. त्यानंतर दिलेल्या ठिकाणावर मुलीचा ठाव न लागल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. नाव शुभम वय २९ वर्ष याने शहर पो. स्टे. ला फिर्याद दिली.
आरोपी सुनेना हेमंत कुरील वय २० मुलगी, ज्योती हेमंत करील वय ४० वर्ष, सयाबाई शिंदे वय ६० वर्ष रा. साई कॉर्नर मराठवाडा ता. जि. परभणी व दिपक सटवाजी ठमके वय ५५ वर्ष रा. कासोळा ता. महागांव या गैरअर्जदारांनी शुभमची फसवणूक केली. गैर अर्जदारांनी खोटी नावे सांगितली, खोटे नातेसंबंध दाखविले व बनावट आधारकार्ड सुध्दा तयार केले. एका ज्वेलर्स मध्ये काम करणाऱ्या मुलाचे लग्न जुळत नसल्यामुळे वरील मुलीशी लग्न करुन घेतले. यातील आरोपी दिपक सटवाजी ठमके याची ओळख आहे. तो लग्न जुळवूण देणारा दलाल आहे. २०२५ ला दिवाळी सणामध्ये तो दुकानात आला आणि लग्नाकरीता एक मुलगी आहे असे सांगितले. त्यामुळे शुभमने श्रीकांत पवार व गजानन अंभोरे यांना घेवून आरोपी ठमके याने बोथी ता. कळमनुरी येथे गेले असता आरोपी मुलगी सुनेना तिला पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुलीची आई आरोपी ज्योती कुरील व आरोपी क्र. ३ सयाबाई शिंदे ही आजी आहे असे सांगितले व ते त्याठिकाणी हजरही होते. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी आरोपी क्र. १ ते ३ हे कासोळा येथे ठमके यांच्या घरी आले आणि पुसद येथे येवून पीडित मुलाचे घर पाहिले. मुलगी पसंत आल्यानंतर चारही आरोपींनी २ लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिल्यानंतर आजच लग्न लावण्यात येईल असे सांगितले. शुभमने त्यांना २ लाख रुपये दिले आण ि ठमके यास ४० हजार रुपये सुध्दा दिले. त्याच दिवशी फिर्यादींच्या घरीच लग्न समारंभ पार पडला. लग्नाच्या वेळी आरोपी मुलीच्या गळ्यात १८ ग्रॅम सोन्याची पोथ व दिड ग्रॅम मणीमंगळसुत्र, चांदीचेजोडवे व तोरड्या असे दागिने मुलीच्या अंगावर घालण्यात आले. त्यानंतर मुलीला शुभमच्या घरी सोडून इतर आरोपी निघून गेले. धार्मिक विधी पार पडल्यानंतर आरोपी मुलीनं तिला कुलदेवीच्या दर्शनाला जायचे असा तिने बहाणा करत मधुचंद्र रात्र सुद्धा घालवली नाही.या लग्नाबाबत १०० रुपयाच्या स्टॅम्पपेपरवर करारनामा सुध्दा करण्यात आला आहे व लग्नाचे फोटो सुध्दा काढण्यात आले आहे. त्यानंतर दि. ५ जानेवारी २०२६ रोजी आरोपी ज्योती कुरील हिने आरोपी मुलगी सुनेना कुरील हिला सांगितले की परतीच्या कार्यक्रमाकरीता माहेरी यावे. त्यानुसार फिर्यादी व नवरी मुलगी हे दि. ६ जानेवारी रोजी तिच्या माहेरी गेले आणि तिथे वधूला सोडून फिर्यादी परत पुसदला आला. ९ जानेवारी रोजी परत येतो असे सांगून ती आलीच नाही. त्यामुळे फिर्यादीने ९ जानेवारी रोजी मुलगी व तिच्या आईला फोनवर विचारणा केली व लवकर नांदायला ये असे सांगितले असता दोघींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर दि. ११ जानेवारी रोजी शुभम व त्याचे नातेवाईक व मित्र बोथी येथे ठमके यांना भेटण्यास गेले. त्या ठिकाणी मुख्य तीन आरोपी हजर नव्हते. त्याठिकाणी वयोवृध्द मनुष्य होता. त्यांनी बंदुके नाव असल्याचे सांगितले आणि स्वतःचे घर असल्याचे सांगितले. वरील तीन आरोपी बाबत त्याला विचारले असता (आरोपी क्र. ३) माझी पत्नी आहे व ती बाहेरगावी असल्याचे सांगितले. परंतु आरोपी १ व २ यांचा माझ्याशी काही संबंध नाही व नातेवाईकही नाहीत असे सांगितले. त्यामुळे शुभम यास फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शहर पो. स्टे. मध्ये फिर्याद दिली. आरोपी क्र. ४ ठमके यांनी ॲक्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार असे सांगितले आणि खोट्या आरोपीखाली जेलमध्ये टाकीन अशी धमकी दिली. सर्व आरोपींनी संगणमत करुन अविवाहित असल्याचा फायदा घेऊन २ लाख ४० हजाराने लुबाडले आणि सोन्या चांदीचे दागिने सुध्दा घेवून गेले. या फिर्यादीरुन दि. १८ फेब्रुवारी रोजी पुसद शहर पो. स्टे. मध्ये सुनेना हेमंत कुरील रा. साई कॉर्नर मराठवाडा ता. जि. परभणी, ज्योती हेमंत कुरील व सयाबाई शिंदे ता. जि. परभणी व दिपक सटवाजी ठमके रा. कासोळा ता. महागांव यांच्या विरुध्द भान्यास ३१६ (२), ३१८ (४) व ३ (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



