तारे जमीन पर’ कार्यक्रमाची आढावा व नियोजन सभा संपन्न!विविध समित्यांच्या प्रमुखांसह मान्यवरांची उपस्थिती

पुसद : ना.इंद्रनिल नाईक यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून शाळकरी विद्यार्थ्यांसाठी ‘तारे जमिन पर’ कार्यक्रमाच्या आयोजना संदर्भात पुसद येथील सुधाकर नाईक प्रेक्षागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी (ता.२४) आढावा व नियोजन सभा संपन्न झाली.सभेला माजी उपसभापती विजय जाधव,कौस्तुभ धुमाळ,धनंजय सोनी,प्रा.संजय चव्हाण, गटशिक्षणाधिकारी धिरज आडे, नागेश जोगदे,विस्तार अधिकारी अमित बोजेवार,सुनिल गवळी,शितलकुमार वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते.नाईक फाऊंडेशनच्या अध्यक्ष ॲड.मोहिनी नाईक यांच्या मार्गदर्शनात ना.ॲड.इंद्रनिल नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गेल्या दोन वर्षांपासून विशेष करुन ग्रामीण भागातील जि.प. व नगर परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार व्यासपीठातून त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कला-गुणांना वाव मिळावा यासाठी ‘तारे जमिन पर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.यावर्षीही नगराध्यक्ष ॲड.मोहिनी नाईक यांच्या मार्गदर्शनात नाईक फाऊंडेशन व पुसदच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन बुधवारी (ता.२८) ‘तारे जमिन पर’ या आयोजित कार्यक्रमासाठीची आढावा व नियोजन सभा संपन्न झाली.सभेत स्वागत, स्टेज, सुरक्षा, बैठक व्यवस्था, भोजन, साहित्य वाटप, साऊंड सिस्टिम /व्हिडिओ डिझाईन व सोशल मीडिया समिती व त्यांची कार्ये ह्या विषयावर सविस्तर चर्चा होऊन नियोजन करण्यात आले.व सर्व कार्यक्रम दर्जेदार करण्यासाठी प्रयत्नरत राहण्याचे उपस्थितांना आवाहन केले.
या सभेला केंद्रप्रमुख मनिष राठोड,मनोज रामधनी,करुणा काळे,संगिता निस्ताने,मंजूश्री जोशी,प्रकाश टेकाळे,गजानन होंडे,भारत जांभूळकर,नंदेश चव्हाण,देवानंद मोहिते,अभिजित नवलकर,यशवंत अघम,संतोष पदमवार,राम अवचार,शशिकांत जामगडे, प्रेम राठोड,अमर शर्मा,सतिश किर्तनकार, अनिल निलावार,सागर राऊत, वंदना चव्हाण, महेश चव्हाण, सानिका कान्हेड, ओमप्रकाश वाघ,लहू पवार,सावन गव्हाणे,मंगेश टिकार,अभिजित बोरकर,गौतम आळणे,विजय मारकड,माधव कानगुले, श्री.इंगळे यांचेसह विविध समितीतील शिक्षक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेत ईश्वर चिठ्ठीद्वारे बेलोरा,काटखेडा, कासोळा,माणिकडोह, मारवाडी, सावरगाव (बंगला), वरूड,गौळ, फेट्रा, काळी, आरेगाव, पारवा, श्रीरामपूर, नगर परिषद – १, जांबबाजार, शेंबाळपिंपरी, चोंढी, पोखरी, नगर परिषद – २, भोजला व व शेलू (बु.) यानुसार केंद्राच्या सादरीकरणाचा क्रम ठरला असून यशस्वितेसाठी नाईक फाउंडेशन, पुसद शिक्षण विभागातील विविध समित्यांचे सदस्य, नाईक मित्र परिवार पुढाकार घेत आहेत.
बुके नको नोटबुक द्या…!
ना.इंद्रनिल नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना शाल,श्रीफळ,बुके, भेटवस्तू आदी न देता त्या ऐवजी ग्रामीण भागातील गरजू मुलांसाठी नोटबुक, पेन,पेन्सील आदी लेखन साहित्य द्यावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.



